पोहण्यासाठी गेलेल्या बुलडाण्याच्या प्रसिद्ध डॉक्‍टरांना हार्टॲटॅक!; हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच काळाचा घाला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यातील संगम तलावात पोहण्यासाठी गेलेल्या शहरातील नामवंत सर्जन डॉ. रामदास भोंडे (72) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.आज, 2 जुलैला सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. डॉ. भोंडे 35 वर्षांपासूम रोज सकाळी पोहायला जात होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी संगम तलावावर गेले होते. पोहत असताना त्यांना अचानक छातीत दुखायला लागले. ही बाब …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाण्यातील संगम तलावात पोहण्यासाठी गेलेल्या शहरातील नामवंत सर्जन डॉ. रामदास भोंडे (72) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.आज, 2 जुलैला सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

डॉ. भोंडे 35 वर्षांपासूम रोज सकाळी पोहायला जात होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी संगम तलावावर गेले होते. पोहत असताना त्यांना अचानक छातीत दुखायला लागले. ही बाब त्यांच्यासोबत असलेले डॉ. अविनाश महाजन यांच्या लक्षात येताच सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना लद्धड हॉस्पिटल येथे आणण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शहरात डॉ. भोंडे यांचे विठ्ठल सर्जिकल व दीपलक्ष्मी मॅटर्निटी नर्सिंग होम नावाचे हॉस्पिटल आहे.

त्यांच्या पत्नी डॉ. सौ. सुचेता भोंडे या सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या दोन्ही मुली डॉक्टर असून, एक अमेरिकेत तर एक मुलगी अकोल्याला आहे. डॉ. भोंडे यांनी 1990 मध्ये जनता दलाकडून बुलडाणा विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. आम आदमी पार्टीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेशही घेतला होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता.