पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू; मेहकर शहरातील घटना

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर शहराला लागून असलेल्या सारंगपूर कट्ट्यावर पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. काल, 29 मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास मृतदेह सापडला. भुवन मंगलसिंग ठाकूर (20, रा. मेहकर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. भुवन 7 ते 8 मित्रांसोबत 28 मे रोजी सायंकाळी सारंगपूर कट्ट्यावर पोहोण्यासाठी गेला होता. तो पाण्यात बुडाल्याचे …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मेहकर शहराला लागून असलेल्या सारंगपूर कट्ट्यावर पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. काल, 29 मे रोजी सकाळी नऊच्‍या सुमारास मृतदेह सापडला. भुवन मंगलसिंग ठाकूर (20, रा. मेहकर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

भुवन 7 ते 8 मित्रांसोबत 28 मे रोजी सायंकाळी सारंगपूर कट्ट्यावर पोहोण्यासाठी गेला होता. तो पाण्यात बुडाल्याचे लक्षात येताच मित्रांनी त्याचा शोध सुरू केला. ही माहिती गावात कळवण्यात आली. मात्र अंधार असल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या. अखेर काल सकाळी मृतदेह पाण्यावर तरंगून आला. यावेळी उपनगराध्यक्ष जयचंद बाठिया, पोलीस उपनिरीक्षक अशोक जायभाये, गणेश लोढे, विजय पडघान, रामेश्वर रिंढे, महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी आर. जी. चनखोरे, तलाठी श्री. गायकवाड, श्री. मेटांगळे उपस्थित होते. भुवनला शोधण्यासाठी नगरसेवक ओम सौभागे, प्रशांत तायडे, दत्ता चांदूरकर, सुनील वाहुळ, सुरेश गायकवाड, अजय शिंदे, राहुल जवंजाळ यांनी पाण्यात उरतून शोधकार्य केले.