‘प्यारवाली लव्हस्टोरी’चा उत्तरार्ध… ती राहणार प्रियकरासोबतच! नवराच म्हणाला, आता त्याच्या घरी सुखी रहा!; पिंपळगाव राजा पोलीसही हैराण, परेशान!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाभरात सध्या एकच उत्कंठा आहे… त्या लव्हस्टोरीचे पुढे काय झाले? बुलडाणा लाइव्हला अनेक कॉल आले… लग्नानंतर काही दिवसांतच पलायन केलेली 20 वर्षीय विवाहिता प्रियकरासह पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात हजर झाली आणि तिने मला नवऱ्यासोबत नव्हे तर प्रियकरासोबतच राहायचे आहे, असा जबाब दिला होता. त्यामुळे पोलीसही थक्क झाले तर तिचा नवरा …
 
‘प्यारवाली लव्हस्टोरी’चा उत्तरार्ध… ती राहणार प्रियकरासोबतच! नवराच म्हणाला, आता त्याच्या घरी सुखी रहा!; पिंपळगाव राजा पोलीसही हैराण, परेशान!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हाभरात सध्या एकच उत्‍कंठा आहे… त्‍या लव्‍हस्‍टोरीचे पुढे काय झाले? बुलडाणा लाइव्‍हला अनेक कॉल आले… लग्‍नानंतर काही दिवसांतच पलायन केलेली 20 वर्षीय विवाहिता प्रियकरासह पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात हजर झाली आणि तिने मला नवऱ्यासोबत नव्‍हे तर प्रियकरासोबतच राहायचे आहे, असा जबाब दिला होता. त्‍यामुळे पोलीसही थक्‍क झाले तर तिचा नवरा भोवळ येऊन पडायला बाकी राहिला होता… ही लव्‍हस्‍टोरी इथेच ब्रेक करत काल आम्‍ही पुढे काय झाले, हे जाणून घेण्यासाठी उद्याची वाट पाहण्यास वाचकांना सांगितले होते. पुढची स्‍टोरीही रोमांचक आणि उत्‍सुकतावर्धक, तितकीच समाजाच्‍या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. लाडाने सांभाळलेल्या लेकीच्‍या इच्‍छेविरोधात तिचे लग्‍न लावण्याचा हा प्रकार होता. त्‍यामुळे तिने खोट्या प्रतिष्ठेला झुगारून प्रियकराला साथ दिली आणि प्रियकरानेही तितक्‍याच विश्वासाने तिला आपलेसे केले. लव्‍हस्‍टोरी समोर आल्यानंतर पतीने तिथेच तिचा कायमचा त्‍याग केला. तिने प्रियकरासोबत पलायन केल्यानंतर लग्‍न उरकले होते. आता ती प्रियकरासोबतच राहत आहे.

लव्‍हस्‍टोरी कुछ ऐसी है…
भारतीचा (काल्पनिक नाव) विवाह खामगाव तालुक्‍यातील हिवरा बुद्रूक येथील एका तरुणासोबत एप्रिलमध्ये पार पडला. मात्र प्रियकरासोबत साथ जियेंगे मरेंगेची शपथ घेतल्याने इच्‍छेविरोधात झालेले हे लग्‍न तिला मान्य नव्‍हते. लग्‍नाच्‍या अवघ्या काही दिवसांतच ती माहेरी शेंबा खुर्द (ता. नांदुरा) येथे गेली. त्‍यानंतर सासरी परतल्यानंतर 28 मे रोजी ती अचानक गायब झाली. बायको गायब झाल्यामुळे भेदरलेल्या अवस्थेत नवऱ्याने पिंपळगाव राजा पोलीस ठाणे गाठले. बायको हरवल्याची तक्रार दिली. 30 मे रोजी या सर्व घटनेने वेगळेच वळण घेतले. ती एका 26 वर्षीय तरुणासोबत ठाण्यात हजर झाली होती. मला नवऱ्यासोबत राहायचे नाही. माझ्या घरच्यांनी माझा विवाह जबरदस्ती लावून दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मला माझ्या प्रियकरासोबत रहायचे आहे. मी त्याच्याशी लग्न करून आले आहे, असे तिने सांगितल्याने पोलीसही हादरले. पोलिसांनी तिच्‍या नवऱ्याला ठाण्यात बोलावून घेतले. तोही बायकोची ही प्यारवाली लव्हस्टोरी ऐकून हैराण, परेशान झाला. महिनाभरापूर्वीच विवाह झालेला असल्याने त्‍याला काय बोलावे हेही सूचेना. अखेर त्‍यानेही हृदय कठोर करत ‘हम दिल दे चुके सनम…’मधल्या अजय देवगनची भूमिका अंगिकारण्याचा निर्णय घेतला. बायकोला आपल्यात इंटरेस्टच नाही म्हटल्यावर बायको सोडण्याची तयारी त्‍याने दर्शविली. लवकरच तो कायदेशीररित्या फारकती घेणार असल्याचे कळते.

शेवटी तिने प्रेम मिळवलेच…
नांदुरा तालुक्यातील शेंबा खुर्द गावात राहणारे भारती आणि भूषण यांचे एकमेकांवर खूप प्रेम. मात्र दोघांची जात वेगळी असल्याने मुलीच्या घरच्यांचा या प्रेमाला विरोध होता. मुलीच्या घरच्यांना मुलीच्या प्रेमसंबंधाची कुणकुण लागताच तिच्या इच्‍छेविरोधात तिचे लग्न उरकण्यात आले. मात्र तरीही तिचे भूषणवरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. आपले प्रेम मिळवायचेच या इराद्यानेच ती दि 28 मे रोजी घरून निघाली होती. 30 मे रोजी थेट लग्न करूनच ठाण्यात पोहोचली.