प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांची अर्ज प्रक्रिया सुरू होणार; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे, 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान चालणार अर्जप्रक्रिया

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके व गळीतधान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. ही अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पीक प्रात्याक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार …
 
प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांची अर्ज प्रक्रिया सुरू होणार; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे, 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान चालणार अर्जप्रक्रिया

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके व गळीतधान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. ही अर्ज प्रक्रिया 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पीक प्रात्याक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकांशी संपर्क करून 10 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी नोंदणी करावी.

शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 10 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. विहित मुदतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके व गळीतधान्य कार्यक्रम जिल्ह्यामध्ये कडधान्य हरभरा, पौष्टीक तृणधान्य, गळीत धान्य यासाठी राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात हरभरा बियाण्यासाठी 10 वर्षांआतील वाणास 25 रुपये प्रती किलो, 10 वर्षांवरील वाणास 12 रुपये प्रती किलो, संकरीत मका 95 रुपये प्रती किलो व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी 10 वर्षांआतील वाणास 30 रुपये प्रती किलो, 10 वर्षांवरील वाणास 15 रुपये प्रती किलो, एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे.

प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे. तसेच पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे, जैविक खते, सुक्ष्म मूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार 2 हजार ते 4 हजार रूपये प्रती एकर मर्यादेत डीबीटी तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांच्‍या शास्त्रज्ञांच्‍या सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी कळविले आहे.