प्रयत्‍नही करूनही फोडले गेले नाही एटीएम!; शेगावमध्ये चोरट्याचा प्रयत्‍न निष्फळ!!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरातील आनंदसागरजवळील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र तो अयशस्वी ठरला. अखेर वैतागून चोरट्याने नाद सोडून दिला आणि पलायन केले. ही घटना १४ जुलैला सायंकाळी सातच्या सुमारास समोर आली. या प्रकरणी आज शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. राजेश रामबिलास संघी (५३) हे सेंट्रल बँक …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरातील आनंदसागरजवळील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्‍न चोरट्यांनी केला. मात्र तो अयशस्वी ठरला. अखेर वैतागून चोरट्याने नाद सोडून दिला आणि पलायन केले. ही घटना १४ जुलैला सायंकाळी सातच्‍या सुमारास समोर आली. या प्रकरणी आज शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

राजेश रामबिलास संघी (५३) हे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक आहेत. ते देवकी अपार्टमेटमध्ये राहतात. त्‍यांनी तक्रार दिली, की सेंट्रल बँक आँफ इंडियाचे आॅफ साइड एटीएम मशिन बाळापूर रोड आनंद सागर येथे आहे. त्‍यात पैसे भरण्याचे काम योगेश झाडोकार करतात. या एटीएम मशिनवर कोणताही िसक्युरिटी गार्ड नेमलेला नाही. तसेच सीसीटीव्‍ही कॅमेरे लावण्यात आलेले नाहीत. १४ जुलैला संध्याकाळी सातला बँकेचे असिस्टंट मॅनेजर समिरन मिस्ट्री यांनी येऊन सांगितले की आनंद सागरजवळील एटीएमला योगेश झाडोकार कॅश भरण्यासाठी गेले असता मशिन फोडलेली दिसली. कोणीतरी लोखंडी अवजाराने एटीएम फोडून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्‍यानंतर स्वतः जाऊन एटीएम मशिनची पाहणी केली व नंतर वरिष्ठ अधिकारी कार्यालय अकोला येथे माहिती दिली , असे तक्रारीत सिंघी यांनी म्‍हटले आहे. त्‍यावरून पोलिसांनी चोरीचा प्रयत्‍न केल्याचा गुन्‍हा चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.