प्राजक्ता म्हणते, मी होते काडीपैलवान!

छोट्या पडद्यावर हुकूमत गाजवणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चर्चेत आलीये ती एका व्हिडिओमुळे. हा व्हिडिओ तिचा लहानपणीचा असून, त्यात ती ‘देवदास’ चित्रपटातील ‘डोला रे डोला’ या गाण्यावर नृत्य करत आहे. यावेळी प्राजक्ता अगदीच किडमिडीत शरीराची मुलगी होती. लहान असल्यापासूनच डान्स आणि अभिनयाची आवड होती, असे तिने सांगितले. ‘सुवासिनी’ या मालिकेतून २०११ मध्ये प्राजक्ताने कलाविश्वात पदार्पण …
 

छोट्या पडद्यावर हुकूमत गाजवणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चर्चेत आलीये ती एका व्हिडिओमुळे. हा व्हिडिओ तिचा लहानपणीचा असून, त्यात ती ‘देवदास’ चित्रपटातील ‘डोला रे डोला’ या गाण्यावर नृत्य करत आहे. यावेळी प्राजक्ता अगदीच किडमिडीत शरीराची मुलगी होती. लहान असल्यापासूनच डान्स आणि अभिनयाची आवड होती, असे तिने सांगितले. ‘सुवासिनी’ या मालिकेतून २०११ मध्ये प्राजक्ताने कलाविश्वात पदार्पण केले. ‘जुळून येती रेशिम गाठी’ या मालिकेतून तिला खऱ्या अर्थाने भरपूर प्रसिद्धी मिळाली. प्राजक्ता घराघरात पोहोचली. प्राजक्ताने ‘खो-खो’, ‘हंपी’ आणि ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटांतही काम केले असून, सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी शो ती होस्ट करत आहे. लहानपणीच्या नृत्याचा व्हिडिओ शेअर करून प्राजक्ताने चाहत्यांना धक्काच दिला. जेव्हा मी काडीपैलवान होते तेव्हा सीडी बघून हुबेहूब डान्स करायचे, असे कॅप्शन तिने व्हिडिओला दिले आहे. हा व्हिडिआे चांगलाच व्हायरल झाला आहे.