प्रातःविधीसाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलीचा विहिरीत आढळला मृतदेह!; चिखली तालुक्यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १६ वर्षीय मुलीने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास मुरादपूर (ता चिखली) येथे समोर आली. पूजा श्यामप्रसाद शेटे (रा. मुरादपूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पूजा तिच्या आई- वडिलांसह शेतात राहत होती. आज सकाळी शौचास जाते असे सांगून घराबाहेर पडली. …
 
प्रातःविधीसाठी गेलेल्या १६ वर्षीय मुलीचा विहिरीत आढळला मृतदेह!; चिखली तालुक्यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १६ वर्षीय मुलीने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्‍या सुमारास मुरादपूर (ता चिखली) येथे समोर आली.

पूजा श्यामप्रसाद शेटे (रा. मुरादपूर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. पूजा तिच्या आई- वडिलांसह शेतात राहत होती. आज सकाळी शौचास जाते असे सांगून घराबाहेर पडली. बराच वेळ होऊनही ती परतली नाही. त्यामुळे घरच्यांनी शोध सुरू केला. त्यावेळी शेजारील चुलत भावाच्या शेतातील विहिरीच्या काठावर तिच्या चपला दिसून आल्या.

विहिरीत डोकावून बघितले असता पाणी गढूळ झाले होते. घरच्यांना संशय आल्याने अंढेरा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नातेवाइकांच्या मदतीने शोध घेतला असता पूजाचा मृतदेह मिळून आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. अंढेरा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. वृत्त लिहीपर्यंत आत्महत्येचे कारण समोर येऊ शकले नाही. तपास ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ कैलास उगले करीत आहेत.