प्रेमविवाह केलेल्या पतीकडून पत्‍नीचा खून!; शेगाव येथील खळबळजनक घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना शेगाव शहरातील आरोग्य कॉलनीत काल, 19 मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. आरोपी मध्यरात्री स्वतः पोलीस ठाण्यात येऊन हजर झाला. सौ. संजीवनी शिवाजी अढाव (22) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिच्या भावाने पोलिसांना दिलेल्या …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या पतीने पत्‍नीचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना शेगाव शहरातील आरोग्य कॉलनीत काल, 19 मे रोजी सायंकाळी साडेसातच्‍या सुमारास घडली. आरोपी मध्यरात्री स्‍वतः पोलीस ठाण्यात येऊन हजर झाला.

सौ. संजीवनी शिवाजी अढाव (22) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काकनवाडा (ता. संग्रामपूर) येथील शिवाजी अढाव याने कावसा (कुटासा, ता. अकोट) येथील संजीवनीसोबत कोर्टात चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर संजीवनीने सासरी जाऊन राहण्याचा प्रयत्‍नही केला. मात्र सासू, सासरे दीर छळ करत असल्याने ती पतीसह शेगाव येथील आरोग्य कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होती. दोघांत नेहमी घरगुती आणि पैशांच्‍या कारणावरून वाद होत हाेते. 2019 मध्ये शेगाव शहर पोलीस ठाण्यात या वादाची तक्रारही झाली होती. मात्र दोघांचे समुपदेशन केल्यानंतर दोघे पुन्‍हा संसार करू लागले होते. दरम्यान, घरून शेतीचे पैसे येत असल्याने शिवाजी व संजीवनीचा प्रपंच सुरू होता, अशी माहिती विवाहितेच्या भावाने पोलिसांना दिली. काल 19 मे रोजी सकाळी अकराला सौ. संजीवनी आणि शिवाजी यांच्यात वाद झाला. दिवसभर शिवाजी बाहेर राहिल्यानंतर संध्याकाळी साडेसातच्‍या सुमारास घरी आला असता दोघांतील भांडण पुन्हा सुरू झाले. याचवेळी संतापाच्या भरात शिवाजीने तिला पलंगावर पाडून गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर तो पुन्हा बाहेर पडला.

मध्यरात्रीनंतर साडेबाराच्‍या एकच्‍या सुमारास तो शेगाव शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्‍याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने आरोग्‍य कॉलनीत धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. कावसा गावच्या पोलीस पाटलाशी संपर्क करून मुलीच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. या प्रकरणी सायंकाळी पोलिसांनी शिवाजीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला करण्यात आली आहे. तपास कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, ठाणेदार संतोष टाले यांच्‍या मार्गदर्शनाखाली एपीआय कमलेश खंडारे करत आहेत.