प्रेमाच्‍या जाळ्यात फसवून युवतीवर शेगावमध्ये बलात्‍कार!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत सलग 4 वर्षे वारंवार बलात्कार करणाऱ्या युवकाविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले, की शेगाव येथील युवतीला मलकापूर येथील माता महाकालीनगर, बसस्थानक परिसरात राहणाऱ्या आशिष त्र्यंबकअप्पा गायगवळे (31) याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः प्रेमाच्‍या जाळ्यात ओढून लग्‍नाचे आमिष दाखवत सलग 4 वर्षे वारंवार बलात्‍कार करणाऱ्या युवकाविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी आज गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी सांगितले, की शेगाव येथील युवतीला मलकापूर येथील माता महाकालीनगर, बसस्‍थानक परिसरात राहणाऱ्या आशिष त्र्यंबकअप्पा गायगवळे (31) याने प्रेमाच्‍या जाळ्यात ओढले. लग्‍नाचे आमिष दाखवून त्‍याने तिच्‍यावर 2015 पासून 16 मार्च 2020 पर्यंत वारंवार बलात्‍कार केला. युवतीने आशिषला लग्‍नाबद्दल विचारले असता तुझ्याकडून जे होईल ते करून घे, असे बोलून त्‍याने तिला धमकावले. पीडित युवतीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी आशिषविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.