फक्त मुंबईतून १०० कोटी तर महाराष्ट्रातून किती?

केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांचा उद्धव ठाकरे, शरद पवारांना सवाल पाटणा : परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बप्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकार व त्यातील पक्षनेत्यांना चौफेर टीका होत आहे. भाजपने आघाडीच्या नेत्यांविरोधात हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी याप्रकरणावर भाष्य करताना एकट्या मुंबईचे टार्गेट १०० कोटी रुपये होते तर मग संपूर्ण महाराष्ट्राचे किती आहे? एकट्या मंत्र्याचे …
 

केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांचा उद्धव ठाकरे, शरद पवारांना सवाल

पाटणा : परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बप्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकार व त्यातील पक्षनेत्यांना चौफेर टीका होत आहे. भाजपने आघाडीच्या नेत्यांविरोधात हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी याप्रकरणावर भाष्य करताना एकट्या मुंबईचे टार्गेट १०० कोटी रुपये होते तर मग संपूर्ण महाराष्ट्राचे किती आहे? एकट्या मंत्र्याचे टार्गेट १०० कोटी होते तर इतर मंत्र्यांना किती टार्गेट देण्यात आले होते? असे प्रश्न विचारत रवीशंकर प्रसाद यांनी त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी उत्तरे द्यावीत, अशी मागणीही प्रसाद यांनी केली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी पत्राद्वारे केलेले आरोप गंभीर असून त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
दुसरीकडे मोदी सरकारमधील आणखी एक मंत्री अनुराग ठाकूर यांनीही ठाकरे सरकरला लक्ष्य केले आहे. मुंबई पोलिसांची ही अवस्था असेल तर महाराष्ट्राची अवस्था काय असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी, असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.एका वरिष्ठ पोलीस अधिकारी व माजी आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे आरोप केले आहेत.ते अतिशय गंभीर असून त्याची तितक्याच गंभीरपणे चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.