फार्महाऊसमध्ये जुगाराचा अड्डा; 9 बडे मासे जाळ्यात!; शेगाव तालुक्‍यात मोठी कारवाई

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्यातील शिरसगाव निळे शिवारातील फार्म हाऊसवर छापा मारून बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने जुगार खेळणारे 9 बडे मासे पकडले आहेत. त्यांच्याकडून तब्बल पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल, 6 मार्चच्या सायंकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली. कारवाईने खळबळ उडाली आहे. श्रीधन कुबेर मंदिराच्या …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्‍यातील शिरसगाव निळे शिवारातील फार्म हाऊसवर छापा मारून बुलडाणा स्‍थानिक गुन्हे शाखेने जुगार खेळणारे 9 बडे मासे पकडले आहेत. त्‍यांच्‍याकडून तब्‍बल पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्‍त करण्यात आला आहे. ही कारवाई काल, 6 मार्चच्‍या सायंकाळी साडेसातच्‍या सुमारास करण्यात आली. कारवाईने खळबळ उडाली आहे.

श्रीधन कुबेर मंदिराच्‍या बाजूला सुरेश ऊर्फ अन्ना नागेश्वर यांच्‍या मालकीच्‍या शेतातील फार्म हाउसमध्ये हा गोरखधंदा सुरू होता. घनशाम माणिकलाल भुतडा (49, रा. राजलालपुरा खामगाव), आजमखान अब्दुल रहेमान खान (54, रा. रामाखनी खामगाव), नसीरोद्दीन अनीसोद्दीन (52, राफाटकपुरा खामगाव), शेख इसाक शेख गुलाब (59, रा. जुनाफैल खामगाव), पुरुषोत्तम केदारमल टिबडेवाल (62, गांधी चौक शेगाव), पुरुषोत्तम जगन्नाथ राठी (60, रा. केदारनगर खामगाव), हिंमत भगवान रोजीया ( 49, रा. राठी प्लॉट खामगाव), संतोष चंद्रभान नागरगोजे (40, रा. चांदमारी खामगाव), गणेश नारायन मुधळकर (62, रा. रेखा प्लाॅट, खामगाव) अशी पोलिसांनी ताब्‍यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्‍यांच्‍याकडून रोख 53720 रुपये, 11 मोबाइल (किमत 40900), 5 मोटासायकली (किमत 180000), एक सतरंजी (किमत 100), 52 ताशपत्ते असा एकूण 2 लाख 74 हजार 720 मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पंचांसमक्ष हा छापा मारण्यात आला. तपास ठाणेदार गोकूळ सूर्यवंशी यांच्‍या मार्गदर्शनाखाली बिट जमादार ज्ञानदेव ठाकरे करत आहेत.

ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने एलसीबीचे सहायक पोलीस निरिक्षक नागेशकुमार चतरकर, श्रीकांत जिंदमवार, पोलीस अंमलदार गजानन आहेर, विजय सोनोने, वैभव मगर, सुभाष वाघमारे, सुधाकर बर्डे यांनी पार पाडली.