फार्म हाऊसमध्ये रंगला जुगार ; ‘एलसीबी’ने बेरंग करत 10 बडे मासे लावले गळाला!!; जामोदमध्ये अडीच लाखांची कारवाई

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फार्म हाऊसवर सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारून बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने 10 बडे मासे गळाला लावले. त्यांच्याकडून 2 लाख 64 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज, 13 मार्चला सकाळी जामोद (ता. जळगाव जामोद) येथे करण्यात आली. रमेश गोविंदा हागे यांच्या शेतशिवारातील फार्म हाऊसवर जुगार सुरू असल्याची …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः फार्म हाऊसवर सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा मारून बुलडाणा स्‍थानिक गुन्हे शाखेने 10 बडे मासे गळाला लावले.  त्‍यांच्‍याकडून 2 लाख 64 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज, 13 मार्चला सकाळी जामोद (ता. जळगाव जामोद) येथे करण्यात आली.

रमेश गोविंदा हागे यांच्या शेतशिवारातील फार्म हाऊसवर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सकाळी 10 च्या सुमारास अड्ड्यावर छापा मारला. या ठिकाणी रमेश गोविंदा हागे (35), राजू सत्यनारायण जोशी (44), सुरेश शंकर भड (38), सयद बिलाल सय्यद कादिर (32), मधुकर शेषराव धुरडे (26), कादखाँ मोहम्मद खाँ (30), सबीरोद्दीन हसीमोद्दीन (30), राजू गोपाल हागे (30), राजू महादेव हागे 30 (सर्व रा. जामोद,ता. जळगाव जामोद) ,सय्यद निजाम सय्यद उस्मान 54 (रा. जळगाव जामोद) जुगार खेळताना आढळले. त्‍यांना अटक करून 59 हजार 600 रुपये रोख, पाच दुचाकी अंदाजे किंमत 1,95,050 व जुगार साहित्य असा एकूण 2 लाख 54 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यता आला. आरोपींना जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने ‘एलसीबी’चे पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार,पोलीस अंमलदार शेख साजिद, युवराज मुळे, संजय नागवे, वैभव मगर, सुभाष वाघमारे, सुधाकर बर्डे यांनी पार पाडली.