फेसबुक मैत्रीतून प्रेम, शरीरसंबंध अन्‌ ती प्रेग्‍नंट!; तरुणाला अटक; शेगावातील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फेसबुक फ्रेंड असलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेगाव येथील गेस्ट हाऊसमध्ये 20 वर्षीय तरुणाने बलात्कार केला. अतुल नारायण साठे (20, रा. टाकळी विरो, ता. शेगाव) असे आरोपीचे नाव आहे. अतुल आणि पीडित मुलीची ओळख फेसबुकवर झाली. दोघांत सुरुवातीला मैत्री झाल्यानंतर चॅटिंग वाढले. चॅटिंगवरून कॉलिंगवर आले. यातूनच दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. …
 

शेगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः फेसबुक फ्रेंड असलेल्या 16 वर्षीय अल्‍पवयीन मुलीवर शेगाव येथील गेस्‍ट हाऊसमध्ये 20 वर्षीय तरुणाने बलात्‍कार केला. अतुल नारायण साठे (20, रा. टाकळी विरो, ता. शेगाव)  असे आरोपीचे नाव आहे.

अतुल आणि पीडित मुलीची ओळख फेसबुकवर झाली. दोघांत सुरुवातीला मैत्री झाल्यानंतर चॅटिंग वाढले. चॅटिंगवरून कॉलिंगवर आले. यातूनच दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्‍यानंतर 9 मार्च 2020 ते 9 मार्च 2021 दरम्‍यान त्‍याने तिला शेगाव येथील खासगी लॉजवर नेऊन वारंवार बलात्‍कार केला. यातून मुलगी प्रेग्‍नंट राहिली. पोटात दुखत असल्याने तिने आईला सांगितल्यावर वैद्यकीय तपासणी केली असता हा प्रकार समोर आला. पीडितेच्‍या आईने तिच्‍यासह शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून अतुल साठेविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी बलात्‍कार आणि पोस्‍को कायद्याअंतर्गत गुन्‍हा दाखल केला आहे. आरोपीला अटक केली असून, त्‍याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक कमलेश खंडारे करत आहेत.