फोन पेनवर बक्षीस लागल्याचे सांगून संग्रामपूरच्‍या व्‍यापाऱ्याला गंडवले!

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फोन पेवर तुम्ही खूप व्यवहार केल्याने बक्षीस लागले आहे. बक्षीस तुमच्या खात्यावर ट्रान्फसर करण्यासाठी मी सांगतो तसे करा, असे तो म्हणाला… व्यापाऱ्यालाही बक्षीसाचा मोह सुटला अन् इथेच घात झाला…. काळी वेळातच त्यांच्या खात्यातून 15200 रुपये गायब झाले. या प्रकरणी या व्यापाऱ्याने तामगाव पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. …
 

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः फोन पेवर तुम्‍ही खूप व्‍यवहार केल्‍याने बक्षीस लागले आहे. बक्षीस तुमच्‍या खात्‍यावर ट्रान्‍फसर करण्यासाठी मी सांगतो तसे करा, असे तो म्‍हणाला… व्‍यापाऱ्यालाही बक्षीसाचा मोह सुटला अन्‌ इथेच घात झाला…. काळी वेळातच त्‍यांच्‍या खात्‍यातून 15200 रुपये गायब झाले. या प्रकरणी या व्‍यापाऱ्याने तामगाव पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.

झाले असे, की संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे शेख कलीम भाजीपाला व्यवसाय करतात. त्‍यांच्‍या मोबाइलवर 8388020917 या नंबरवरून कॉल आला. मी विनयकुमार सिंह बोलतो, असे त्‍याने व्यापाऱ्याला सांगितले. आपण फोन पेचा वापर करतात. त्यात काही समस्या आहे का, असे विचारले. त्‍यानंतर तुम्‍हाला जास्‍त व्‍यवहार केल्यामुळे 3100 रुपयांचे बक्षीस लागले असून, हे बक्षीस हवे असेल तर मी सांगतो तसे करा, असे म्‍हणून त्‍याने शेख कलीम यांना फोन पे ओपन करायला सांगितले. ऑनलाइन फोन पे सुरू करताच कलीम शेख यांच्‍या एसबीआयच्‍या संग्रामपूर शाखेतील खात्‍यातून 15200 रुपये गायब झाले. बांद्रा मुंबई येथील फोन पे ऑफिसमधून बोलत असल्‍याचे या सिंह नामक भामट्याने सांगितले होते.