बँकेला गंडवले! आधी कर्जदार आता शेगावच्‍या तलाठ्याला अटक!; गहाण प्‍लॉट परस्पर विकले

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बँकेने पत्र देऊनही प्लॉटवर कर्जाचा बोजा न चढवल्याने कर्जदाराने गहाण दिलेले प्लॉट परस्पर विकले. बँकेला त्याची पूर्वकल्पना दिली नाही. त्यामुळे बँकेची मोठी फसवणूक झाली. याप्रकरणी बँकेने शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यापूर्वीच कर्जदार डिगांबर भिकाजी पुरी याला शेगाव शहर पोलिसांनी १५ एप्रिलला अटक केली होती. …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बँकेने पत्र देऊनही प्लॉटवर कर्जाचा बोजा न चढवल्याने कर्जदाराने गहाण दिलेले प्लॉट परस्पर विकले. बँकेला त्याची पूर्वकल्पना दिली नाही. त्यामुळे बँकेची मोठी फसवणूक झाली. याप्रकरणी बँकेने शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यापूर्वीच कर्जदार डिगांबर भिकाजी पुरी याला शेगाव शहर पोलिसांनी १५ एप्रिलला अटक केली होती. आता तपासादरम्यान शेगाव भाग २ चे तत्कालिन तलाठी सुनील जगन्नाथ ठोंबरे (४५,रा. ओमनगर, शेगाव) यांना आज, ३ जुलैला अटक करण्यात आली आहे. त्‍यामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.

शेगाव शहरातील रहिवासी डिगांबर भिकाजी पुरी याने २०१३ मध्ये जिजाऊ कमर्शिअल को-ऑप. बँक शाखा अकोला यांच्याकडून ६० लाख रुपये कर्ज घेतले होते. तारण म्हणून बँकेला त्‍याने शेगाव भाग २ मधील त्याचे प्लॉट क्र. ८५ ते ८९ गहाण दिले होते. बँकेच्या पत्रावरून सातबारामध्ये हस्तलिखित नोंदही घेतली होती. मात्र नंतर ऑनलाइन सातबारा झाल्यानंतर तत्कालिन तलाठी सुनील ठोंबरे यांनी हेतूपुरस्सरपणे सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा चढवला नाही. नंतर कर्जदार डिगांबर पुरी याने बँकेला गहाण दिलेले प्लॉट परस्पर विकले. बँकेला या व्यवहाराची कल्पना दिली नाही. त्यामुळे बँकेचा विश्वासघात व फसवणूक झाली, अशी तक्रार बँकेच्या व्यवस्थापकाने शेगाव शहर पोलीस ठाण्यात दिली होती. आज या प्रकरणात शेगाव भाग २ च्या तत्कालिन तलाठी सुनील ठोंबरे यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी व शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले व पोलीस नाईक राहुल पांडे करीत आहेत.