बंगालमध्ये टीएमसी, केरळात एलडीएफ तर तामिळनाडूत डीएमके!

नवी दिल्ली ः कोविड 19च्या प्रोटोकॉलनुसार पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या राज्यांतील मतमोजणी सुरु असली तरी, या निवडणुकांचे अत्यंत धक्कादायक निकाल हाती येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली असून, तामिळनाडूत डीएमके सत्तेच्या जवळ पोहोचले आहे, तर केरळात पुन्हा एकदा एलडीएफची सत्ता येणे निश्चित आहे. तर आसाममध्ये भाजपची सत्तेकडे …
 

नवी दिल्ली ः कोविड 19च्या प्रोटोकॉलनुसार पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या राज्यांतील मतमोजणी सुरु असली तरी, या निवडणुकांचे अत्यंत धक्कादायक निकाल हाती येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली असून, तामिळनाडूत डीएमके सत्तेच्या जवळ पोहोचले आहे, तर केरळात पुन्हा एकदा एलडीएफची सत्ता येणे निश्चित आहे. तर आसाममध्ये भाजपची सत्तेकडे जोरदार आगेकूच सुरु आहे. तामिळनाडू, केरळ आणि पांडेचरीसाठी 6 एप्रिलरोजी एका टप्प्यात मतदान झाले होते तर इतर राज्यांत 27 व 29 मार्चरोजी मतदान झाले होते.

दुपारपर्यंत हाती आलेले निकाल

  • पश्चिम बंगाल – टीएमसी 207 जागांसह आघाडीवर, भाजप 81 जागावर आघाडीवर
  • तामिळनाडू – डीएमके आघाडी 143 जागांवर आघाडीवर तर एआयडीएमके 90 जागांवर आघाडीवर
  • केरळ – एलडीएफ 92 जागांवर आघाडीवर तर युडीएफ 46 जागांवर आघाडीवर
  • आसाम – भाजप व मित्रपक्ष 75 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस 48 जागांवर आघाडीवर
  • पाँडेचेरी – भाजप 8 तर काँग्रेस चार जागांवर आघाडीवर