बचत गटाच्‍या महिलांचा सक्‍तीने काढला आरोग्‍य विमा… शेलसूरच्‍या एसबीआयमध्ये 50 च्‍यावर महिलांचा ठिय्या!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेलसूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेने बचत गटाच्या अध्यक्षांचा 1300 रुपये आणि सदस्यांचा 500 रुपये आरोग्य विमा सक्तीने काढून घेतला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर बचत गटांच्या महिलांनी पैसे परत करण्यासाठी बँकेकडे मागणी केली. मात्र टाळाटाळ करणे, दिवसभर बसवून ठेवणे, अपमानास्पद वागणूक देणे आदी प्रकार बँकेकडून घडत असल्याने काल, 7 …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेलसूर येथील भारतीय स्‍टेट बँकेच्‍या शाखेने बचत गटाच्‍या अध्यक्षांचा 1300 रुपये आणि सदस्यांचा 500 रुपये आरोग्‍य विमा सक्‍तीने काढून घेतला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर बचत गटांच्‍या महिलांनी पैसे परत करण्यासाठी बँकेकडे मागणी केली. मात्र टाळाटाळ करणे, दिवसभर बसवून ठेवणे, अपमानास्पद वागणूक देणे आदी प्रकार बँकेकडून घडत असल्याने काल, 7 जूनला जवळपास 40 ते 50 महिलांनी बँकेवर धडक देऊन ठाण मांडले. त्‍यांची आक्रमकता पाहून बुलडाणा येथील मुख्य शाखेच्‍या अधिकाऱ्यांनी पैसे परत करण्याबद्दल लेखी दिले. त्‍यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. तब्‍बल 3 तास महिलांनी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वेठीस धरले होते.

प्रभारी शाखा व्यवस्‍थापक राकेश वसावी, रोखपाल जाधव, विभागीय अधिकारी अमोल गवई यांच्‍याकडे महिलांनी तक्रार मांडली. विम्याच्‍या नावावर फसवणूक केल्याचा आरोप महिलांनी यावेळी केला. विम्‍यासाठी घेतलेले पैसे परत करा, सर्व पावत्‍या द्या, शाखा व्यवस्‍थापक पवार यांच्‍यावर कारवाई करा अशी मागणी महिलांनी केली. बुलडाणा मुख्य शाखेतून अधिकारी अमोल घोलप, राजेंद्र कुलकर्णी यांनी शेलसूरला येऊन महिलांना 10 दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. मागण्या पूर्ण न झाल्‍यास बँकेसमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला. यावेळी भाजपा युवा मोर्चाने संतोष काळे, सिद्धेश्वर ठेंग, संतोष जराड, दीपक पाटील, गोपाल शेळके, दुर्गादास इंगळे, पुरुषोत्तम काटे, विश्वंभर हळदे, रघुनाथ गायकवाड, बचत गटाच्‍या रुख्मिनी पवळ, अश्विनी काटे, वर्षा वायकोस, सुवर्णा भालेकर, वनिता हळदे, अलका रिंढे, सकीना पंडीत, नंदा भोसले यांच्‍यासह 40 ते 50 महिलांची उपस्‍थिती होती.