बनावट उंट बिडी प्रकरण; व्‍यापाऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उंट बिडी कंपनीच्या नावाची नक्कल करून बनावट बिडीची विक्री करणाऱ्या मलकापुरातील व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला शुक्रवारी (दि.12) अटक करण्यात आली होती. व्यापारी अमर रामचंद्र तलरेजा याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जिल्ह्यातील मलकापूर शहरात बनावट उंट बिडी विकली जात असल्याची माहिती उंट बिडीच्या …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः उंट बिडी कंपनीच्या नावाची नक्कल करून बनावट बिडीची विक्री करणाऱ्या मलकापुरातील व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला  शुक्रवारी (दि.12) अटक करण्यात आली होती. व्‍यापारी अमर रामचंद्र तलरेजा याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मलकापूर शहरात बनावट उंट बिडी विकली जात असल्याची माहिती  उंट बिडीच्‍या उत्पादक कंपनीला मिळाली होती. या बाबतची शाहनिशा केल्यानंतर कंपनीचे सर्व्हेअर अमोल कुलकर्णी यांनी याची तक्रार मलकापूर शहर पोलिसांत दिली होती. पोलिसांनी या तक्रारीवरून 12 मार्च रोजी मलकापूर शहरातील रामचंद्र ट्रेडर्सवर छापा मारला. दुकानातून उंट बिडी या प्रचलित कंपनीच्या नावाचा बनावट साठा किंमत 12 हजार रुपये जप्त करण्यात आला होता. यावेळी आरोपी अमर रामचंद्र तलरेजा याच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आले होती.