बनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा!

पुणे ः १३ वर्षांपूर्वी झालेल्या एका खून प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फरार घोषित केले. आरोपीने चलाखीने बनावट कागदपत्रांच्या आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, डेबीट कार्ड तयार करून घेतले. दुसऱ्याच नावाने तो राहत होता. सलग १३ वर्षे पोलिसांच्या तो हाती लागला नाही. अन्य एका गुन्ह्यात त्याला अटक केल्यानंतर खुनातील आरोपीही “तो’च असल्याचे निष्पन्न झाले.हनुमंत उर्फ पिंट्या महादेव …
 

पुणे ः १३ वर्षांपूर्वी झालेल्या एका खून प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने फरार घोषित केले. आरोपीने चलाखीने बनावट कागदपत्रांच्या आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, डेबीट कार्ड तयार करून घेतले. दुसऱ्याच नावाने तो राहत होता. सलग १३ वर्षे पोलिसांच्या तो हाती लागला नाही. अन्य एका गुन्ह्यात त्याला अटक केल्यानंतर खुनातील आरोपीही “तो’च असल्याचे निष्पन्न झाले.
हनुमंत उर्फ पिंट्या महादेव चव्हाण (३८, रा. विद्यानगर, चिंचवड) असं त्याचं नाव. दुसऱ्या खुनाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडच्या तपासणीत बनावट कागदपत्रे आढळली. चव्हाण याच्यावर खुनासह इतर गुन्हे दाखल आहेत. अटक टाळण्यासाठी त्याने बनावट आधार कार्ड, सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि बँक ऑफ बडोदाचे डेबिड कार्ड बनविले. त्याने ही कागदपत्रे अमित महादेव पाटील या नावाने बनविली होती. पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने अन्य एका खून प्रकरणात पिंट्याला अटक केली, तेव्हा हा सारा बनाव उघडकीस आला.