बर्ड फ्लूचा सामना करण्यासाठी 13 तालुक्यांसाठी समित्या

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भानखेडमुळे अधिकच सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने बर्ड फ्लू प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून 13 तालुक्यांसाठी समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली 13 तालुकास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. उप विभागीय अधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सदस्य …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भानखेडमुळे अधिकच सतर्क झालेल्या जिल्हा प्रशासनाने बर्ड फ्लू प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून 13 तालुक्यांसाठी समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली 13 तालुकास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. उप विभागीय अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सदस्य म्हणून विविध विभागांच्या 10 अधिकार्‍यांचा समावेश आहे. त्यांच्यावर बर्ड फ्लू विषयक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तहसीलदार यांच्यावर विविध विभागांशी समन्वय साधण्याची, तालुका आरोग्य अधिकारी यांना जलद कृती संघातील सदस्यांची आरोग्य तपासणी, पीपीई किट, क्षेत्रीय वन अधिकारी यांच्यावर स्थलांतरित पक्षी, कावळे, चिमण्या, साळुंकी यांवर नजर ठेवून पशुसंवर्धन विभागाशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी आहे. ग्रामीण भागाशी निगडित असल्याने बीडीओंवर अर्थातच मुख्य जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या आहेत. चुना पावडर, ब्लिचिंग पावडर, प्लास्टिक, एचडीपी बॅगचा पुरवठा करणे, मृत पक्ष्यांचे ग्रामसेवक, तलाठी व पर्यवेक्षक यांच्या मदतीने पंचनामे, बाधित पोल्ट्रीचा परिसर निर्जंतुक करणे, पक्षी नमुने पुणे येथे पाठविण्यासाठी वाहन पुरविणे. याशिवाय समितीत पोलीस निरीक्षक, पशुधन विकास अधिकारी, सार्वजनिक बांधकामचे अभियंता, उप अधीक्षक भूमी अभिलेख, पशुसंवर्धन (राज्य) च्या अधिकार्‍यांचा समावेश आहे.