बर्ड फ्लू : 2 हजार बाधित कोंबड्यांना दयामरण देण्यास प्रारंभ!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. रामामूर्ती यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत बर्ड फ्लूच्या लागणीचा केंद्रबिंदू ठरलेल्या भानखेड (ता. चिखली) येथील कमीअधिक 2 हजार बाधित कोंबड्या व पूरक साहित्य नष्ट करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करत या दयामरण प्रक्रियेस आज, …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. रामामूर्ती यांच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत बर्ड फ्लूच्या लागणीचा केंद्रबिंदू ठरलेल्या भानखेड (ता. चिखली) येथील कमीअधिक 2 हजार बाधित कोंबड्या व पूरक साहित्य नष्ट करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करत या दयामरण प्रक्रियेस आज, 26 जानेवारीच्या संध्याकाळी सुरुवात करण्यात आली.
या संपूर्ण गुंतागुंतीच्या व संवेदनशील प्रक्रियेचे काटेकोर नियोजन करत टीमवर्कद्वारे त्याची अंमलबजावणी करण्याचे आव्हान पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर पुंडलिक बोरकर व त्यांच्या सहकार्‍यांनी यशस्वीपणे पेलले. पक्षी, अंडी, पशु खाद्य याची विल्हेवाट लावताना पुरेपूर दक्षता घेण्यात आली. सॅनिटायझर, पीपीई किट, मास्क, निर्जंतुक औषधी यांचा पुरेपूर वापर करण्यात आला. प्रारंभीच्या टप्प्यात जनार्धन दत्तू इंगळे यांच्या घरानजीकच्या पोल्ट्री फार्म मधील पक्ष्यांची विल्हेवाट लावण्याचे नियोजन असून ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालली.


भूमी अभिलेखचीही मदत
दरम्यान, इंगळे यांच्या पोल्ट्रीपासून 1 कि.मी. अंतर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रातील पक्षी, अंडी यांची देखील विल्हेवाट लावण्यात येणार आहे. हे क्षेत्र ठरविण्यासाठी (अचूक मोजमापसाठी) भूमी अभिलेख विभागाची मदत घेतल्याची माहिती ऑपरेशन दयामरणमध्ये सहभागी वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. यामुळे संपूर्ण इन्फेक्टेड झोनमधील ही प्रक्रिया किंचित लांबली आहे. यापूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने इन्फेक्टेड झोन व निगराणी क्षेत्र घोषित करून संबंधित पोल्ट्रीसह बाधित क्षेत्रातील पक्षी, अंडी व खाद्याची केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे तातडीने विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले. तसेच पुढील 21 दिवस बाधित केंद्रापासून 10 किलोमीटर अंतरातील कुक्कुट, अंडी व खाद्याची अन्यत्र वाहतूक करण्यात मनाईचे आदेश बजावले. बाधित कोंबड्यांची तसेच 1 किलोमीटर परिसरातील पक्षी, अंडी, खाद्य यांची शास्त्रीय पद्धतीने कलिंग करून तात्काळ विल्हेवाट लावण्याचे आदेश देण्यात आले. पशुसंवर्धनचे उपायुक्त श्री. बोरकर यांच्या मार्गदर्शनात जलद कृती दल यात सहभागी झाले आहे. प्रत्येक घडामोडीवर एसडीओ राजेश्‍वर हांडे, तहसीलदार अजित येळे नजर ठेवून आहेत.