बलात्‍कार करतानाचा व्‍हिडिओ तयार करून विवाहितेला ब्‍लॅकमेल!; दोनदा केला लैंगिक अत्‍याचार!; दोघेही खामगावचे, घटना शेगावमध्ये

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विवाहितेवर बलात्कार करतानाचा व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव शहरात समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आज, 16 मार्चला खामगाव शहर पोलिसांनी 30 वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्रांनी सांगितले, की 42 वर्षीय विवाहितेची जुना फैल भागातील अशोक शेषराव …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः विवाहितेवर बलात्‍कार करतानाचा व्‍हिडिओ तयार करून तो व्‍हिडिओ व्‍हायरल करण्याची धमकी देऊन पैशाची मागणी केल्याचा धक्‍कादायक प्रकार खामगाव शहरात समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्‍या तक्रारीवरून आज, 16 मार्चला खामगाव शहर पोलिसांनी 30 वर्षीय युवकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी सांगितले, की 42 वर्षीय विवाहितेची जुना फैल भागातील अशोक शेषराव इंगळे (30) याच्‍यासोबत फ्रिज फायनान्सवर घेण्याच्‍या कारणावरून ओळख झाली होती. ओळखीचा फायदा उचलून इंगळेने तिला शेगाव येथील लॉजवर नेले व चाकूचा धाक दाखवून बलात्‍कार केला. त्‍यानंतर तिला कन्या शाळेच्‍या मैदानावर नेऊन पुन्‍हा बलात्‍कार केला. बलात्‍काराचा व्‍हिडिओही तयार केला. या व्‍हिडिओद्वारे नंतर त्‍याने ब्‍लॅकमेल करत पैशांची मागणी सुरू केली. आजवर महिलेने अशोकला 1 लाख रुपये दिले असल्याचे तिने तक्रारीत म्‍हटले आहे. आणखी पैसे न दिल्यास व्‍हिडिओ व्‍हायरल करण्याची धमकी त्‍याने दिली. त्‍यामुळे पीडितेने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी इंगळेविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.बलात्‍कार करतानाचा व्‍हिडिओ तयार करून विवाहितेला ब्‍लॅकमेल!; दोनदा केला लैंगिक अत्‍याचार!; दोघेही खामगावचे, घटना शेगावमध्ये