बसमध्ये चढत होती… तिच्‍यासोबत घडली ती धक्‍कादायक घटना!; चिखली बसस्‍थानकावरील प्रकार

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बसमध्ये चढताना विवाहितेच्या पर्समध्ये हात घालून चोरट्याने मोबाइल, सोन्याची मोरणी आणि रोख २ हजार रुपये लांबवले. ही घटना चिखली बसस्थानकावर ५ जुलैला दुपारी घडली. चिखली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अरुण नामदेव पाटील (५७, रा. जिजाऊनगर, चिखली) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे, की त्यांचे मोठे …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बसमध्ये चढताना विवाहितेच्‍या पर्समध्ये हात घालून चोरट्याने मोबाइल, सोन्याची मोरणी आणि रोख २ हजार रुपये लांबवले. ही घटना चिखली बसस्‍थानकावर ५ जुलैला दुपारी घडली. चिखली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

अरुण नामदेव पाटील (५७, रा. जिजाऊनगर, चिखली) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले आहे, की त्‍यांचे मोठे भाऊ देउळघाट (ता. बुलडाणा) येथे राहतात. त्यांची सून वैशाली श्रीकांत पाटील ही काल दुपारी शेलगाव जहाँगीरवरून देऊळघाट येथे जाण्यासाठी चिखली बसस्थानकावर आली होती. बुलडाणा जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढताना तिच्‍या पर्समध्ये हात घालून चोरट्याने रेडमी कंपनीचा मोबाइल (किंमत अंदाजे ५ हजार रुपये), रोख २ हजार रुपये व एक ग्रमची नाकातील सोन्याची मोरनी (किंमत ४ हजार रुपये) लांबवली. तिकिट काढण्यासाठी तिने पर्स पाहिली असता पर्सची चैन खुली होती व पर्समधील पैसे, मोबाइल, दागिने गायब होते. एकूण ११ हजारांचा मुद्देमाल या घटनेत चोरी गेल्याची तक्रार चिखली पोलिसांत करण्यात आली आहे.