बाजारात पाकीट मारले… लोकांनी रंगेहात पकडून धो धो धुतला; शेगाव शहरातील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बाजारात गणपती खरेदी करणाऱ्या एका व्यक्तीचे पाकीट मारताना चोरट्याला नागरिकांनी रंगेहात पकडून धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना आज, १० सप्टेंबर रोजी शेगाव शहरातील आठवडे बाजारात घडली. नितीन उर्फ गोल्या नामदेव गायकवाड (२९, रा. तीन पुतळे परिसर, शेगाव) असे चोरट्याचे नाव आहे. सुनील लक्ष्मण चांदणे (५३, रा. शेगाव) हे …
 
बाजारात पाकीट मारले… लोकांनी रंगेहात पकडून धो धो धुतला; शेगाव शहरातील घटना

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बाजारात गणपती खरेदी करणाऱ्या एका व्यक्तीचे पाकीट मारताना चोरट्याला नागरिकांनी रंगेहात पकडून धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना आज, १० सप्टेंबर रोजी शेगाव शहरातील आठवडे बाजारात घडली. नितीन उर्फ गोल्या नामदेव गायकवाड (२९, रा. तीन पुतळे परिसर, शेगाव) असे चोरट्याचे नाव आहे.

सुनील लक्ष्मण चांदणे (५३, रा. शेगाव) हे त्यांचा मुलगा प्रणित याच्यासह गणपती खरेदी करण्यासाठी आठवडे बाजारात आले होते. गणपती खरेदी करत असताना त्यांच्या पॅन्टच्या खिशातून कुणीतरी पाकीट काढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मागे वळून पाहताच चोरटा पाकीट घेऊन गर्दीतून पळ काढू लागला. चांदणे यांनी आरडाओरड केल्याने त्यांचा मुलगा प्रणित व नागरिकांनी चोरट्याला पाठलाग करून पकडले. नागरिकांनी चोरट्याला लाथाबुक्यांचा प्रसाद दिला. पोलिसांनी धाव घेत चोरट्याला ताब्यात घेऊन त्याने चोरलेले चांदणे यांचे पाकीट व ५५०० रुपये जप्त केले. चांदणे यांच्‍या तक्रारीवरून चोरटा नितीन उर्फ गोल्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.