बाधितांचा आकडा घसरला पण मृत्‍यू थांबेनात; तीन महिलांचा कोरोनामुळे मृत्‍यू, 76 नवे पॉझिटिव्‍ह

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घसरत असला तरी मृत्यूचे थैमान मात्र थांबायला तयार नाही. आज, 5 जून रोजी कोरोनाने तीन महिलांचा बळी घेतला असून, नव्या 76 रुग्णांची भर पडली आहे. उपचारादरम्यान अंचरवाडी (ता. चिखली) येथील 70 वर्षीय महिला, बुलडाणा येथील 71 वर्षीय महिला, उमाळी (ता. मलकापूर) येथील 46 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू …
 
बाधितांचा आकडा घसरला पण मृत्‍यू थांबेनात; तीन महिलांचा कोरोनामुळे मृत्‍यू, 76 नवे पॉझिटिव्‍ह

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घसरत असला तरी मृत्‍यूचे थैमान मात्र थांबायला तयार नाही. आज, 5 जून रोजी कोरोनाने तीन महिलांचा बळी घेतला असून, नव्या 76 रुग्‍णांची भर पडली आहे. उपचारादरम्यान अंचरवाडी (ता. चिखली) येथील 70 वर्षीय महिला, बुलडाणा येथील 71 वर्षीय महिला, उमाळी (ता. मलकापूर) येथील 46 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4140 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4064 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 76 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 40 व रॅपीड टेस्टमधील 36 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 574 तर रॅपिड टेस्टमधील 3490 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 6, बुलडाणा तालुका : तराडखेड 1, सावळा 1, अटकळ 1, भादोला 1, सातगाव 1, चांडोळ 2, मोताळा तालुका : पोफळी 1, तालखेड 1, सावरगाव 1, खामगाव तालुका : लाखनवाडा 1, चिखली शहर :1, चिखली तालुका : सावरखेड 2, मेरा खुर्द 2, शेलगाव जहाँगीर 3, देऊळगाव राजा शहर : 2, देऊळगाव राजा तालुका : सिनगाव जहाँगीर 1, जांभोरा 3, वैजापूर 1, भिवगन 1, देऊळगाव मही 2, खल्याळ गव्हाण 1, नागनगाव 1, सिंदखेड राजा तालुका : दुसरबीड 1, नशिराबाद 1, मेहकर शहर : 1, मेहकर तालुका : देऊळगाव माळी 2, मोळा 1, आरेगाव 1, संभापूर 1, जळगाव जामोद शहर : 4, जळगाव जामोद तालुका : वडशिंगी 1, खांडवी 1, नांदुरा तालुका : अंबोडा 1, जिगाव 1, काटी 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : किन्ही 1, शेगाव शहर : 4, शेगाव तालुका : शिरसगाव निळे 1, संग्रामपूर तालुका : टूनकी 1, मलकापूर शहर : 3, मलकापूर तालुका : धोंगर्डी 3, भाडगणी 1, उमाळी 1, मोरखेड 1, परजिल्हा अमरावती 1, जांबुपानी जि. बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) अशाप्रकारे जिल्ह्यात 76 रुग्ण आढळले आहे.

1136 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आज 139 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 500838 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 83723 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 139 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 85488 कोरोनाबाधित रुग्ण असून, 1136 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 629 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.