बापरे बाप! खामगावात 36 लाखांचा गुटखा जप्त!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली पाठोपाठ प्रतिबंधित गुटख्याची ठोक उलाढाल करण्यासाठी कुविख्यात झालेल्या खामगावात तब्बल 35 लाख 64 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 20 जानेवारीच्या मध्यरात्री अन्न व औषध प्रशासन विभागाने खामगाव पोलिसांच्या मदतीने ही जंबो कारवाई करत एका छोट्या माशाला ताब्यात घेतले आहे. खामगावमधील डीपी रोडवरील राघव कॉम्प्लेक्समधील एका …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली पाठोपाठ प्रतिबंधित गुटख्याची ठोक उलाढाल करण्यासाठी कुविख्यात झालेल्या खामगावात तब्बल 35 लाख 64 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 20 जानेवारीच्या मध्यरात्री अन्न व औषध प्रशासन विभागाने खामगाव पोलिसांच्या मदतीने ही जंबो कारवाई करत एका छोट्या माशाला ताब्यात घेतले आहे.


खामगावमधील डीपी रोडवरील राघव कॉम्प्लेक्समधील एका दुकानात गुटख्याचा अवैध साठा असल्याची माहिती मिळाल्यावरून अन्न व औषध प्रशासनाचे एक पथक खामगाव शहर पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. दुकानातील 40 पोत्यांत असलेला नजर, गोवा, आरजे आणि सुगंधी तंबाखूचा साठा पाहिला व मोजला तेव्हा पथक देखील थक्क झाले! या मालाची किंमत 36 लाखांच्या घरात पोहोचल्यावर तर ते चक्रावून गेले. यावेळी अजय खंडारे (रा. शिरजगाव देशमुख ता. खामगाव) यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिनियम व मानके कायदा 2006 व भादंवीच्या कलम 188, 272, 273 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत एफडीचे रवींद्र सोळंके, जी. के. वसावे, शहर पो.स्टे.चे पीएसआय रणजितसिंह ठाकूर, संदीप टेकाळे, संजय धंदर सहभागी झाले. या घटनेतील बड्या माश्याचा अर्थात मुख्य आरोपीचा कधी शोध लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.