बापरे बाप! 1022 पॉझिटिव्ह!!,9 तालुक्यांत कोरोना स्फोट; बुलडाण्याचे द्विशतक; 3 तालुक्यांची शतकीय संख्या

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : जिल्हा संडे मूडमध्ये असताना आणि घरोघरी मटण की चिकन अशी चाय पे चर्चा सुरू असताना आणि छंदी फंदी मंडळींचे मोबाईलवर ‘आज कुठे बसायचं’ अशी विचारणा सुरू असतानाच कोरोनाने सकाळीच या एन्जॉय मूडवर कडू काढे ओतले! आज, 4 मार्चला तब्बल 1022 कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या वार्तेने होम मिनिस्टरच्या फतव्याने अनेकांचे बाहेरचे बेत रद्द …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : जिल्हा संडे मूडमध्ये असताना आणि घरोघरी मटण की चिकन अशी चाय पे चर्चा सुरू असताना आणि छंदी फंदी मंडळींचे मोबाईलवर ‘आज कुठे बसायचं’ अशी विचारणा सुरू असतानाच कोरोनाने सकाळीच या एन्जॉय मूडवर कडू काढे ओतले! आज, 4 मार्चला तब्बल 1022 कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या वार्तेने होम मिनिस्टरच्या फतव्याने अनेकांचे बाहेरचे बेत रद्द झाले आणि सर्वांचा मूड खराब झाला.
आठवड्याच्या शेवटी शेवटी अर्थात विकेंडला कोरोना थोडा शांत होतो असा 28 लाख जिल्हावासियांनाचा अनुभव आहे. मात्र आता जास्त पॉवरफुल व त्यामुळेच माजलेला कोविड कुमार एप्रिलमध्ये ते सुख सुद्धा द्यायला तयार नाय! काल शनिवारी 929 तर आज रविवारी शेकड्यात नव्हे थेट चार आकड्यांत पेशंट आढळले. कोरोनाच्या अधीन गेलेल्या बुलडाणा तालुक्याने पुन्हा सव्वा दोनशेचा आकडा ओलांडत 238 पर्यंत मजल मारली. खामगाव तालुक्याने 146 रुग्‍णांचा आकडा गाठला. मलकापूर 134 रुग्‍ण, चिखली 108 या तालुक्यांनी नाबाद शतके झलकावली!

उद्रेक आणि उद्रेकच…
वरील तालुके जिल्ह्यातील टॉपर आहेत. त्यांचा हा स्कोअर रोजची. सामान्य बाब झाली आहे. मात्र त्यांचे इतर सहकारी देखील फारसे मागे नाहीत. गत 24 तासांत मेहकर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 81, नांदुरा 70, जळगाव जामोद 73, देऊळगाव राजा 57, सिंदखेड राजा 49 असा आला आहे. या तालुक्यांत अलीकडच्या पाचेक दिवसांत कोरोनाने मारलेली मुसंडी धोका आणि धक्कादायक अशीच आहे. लोणार 28, मोताळा 24, शेगाव 4 मधील संख्या कमी आल्याने त्यांचा संडे चांगला गेला पण मंडेची ग्यारंटी कोण घेणार? संग्रामपूरमध्ये 13 पॉझिटिव्ह निघणे ही मोठी बातमी(!)च आहे. तिथे पेशंट आहे हीच मुळात बातमी आहे. यावर कळस म्हणजे आज प्राप्त 5803 अहवालांमधील 1022 पॉझिटिव्ह येणे ही शॉकिंग न्यूज आहे. यंत्रणा यामुळे हादरणे स्वाभाविक आहे. त्यांचा संडेच काय पुढचा सर्व आठवडाही खराब जाणार हे नक्की.