बापरे बाप 885 पॉझिटिव्ह! विक्रमी नमुने, विक्रमी अहवाल, विक्रमी पॉझिटिव्ह संख्या!

3 तालुके सव्वाशेच्या घरात , जळगाव , सिंदखेडराजात वाढला उद्रेक बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विक्रमी नमुने संकलन, विक्रमी संख्येने प्राप्त अहवाल अन् विक्रमी पॉझिटिव्हचा आकडा हे गत 24 तासांचे वैशिष्ट्य ठरले. याचबरोबर सिंदखेड राजा, जळगाव जामोद, नांदुरा मध्ये कोरोनाचा पुन्हा झालेला उद्रेक या गंभीर वैशिष्ट्यांमध्ये भर ठरली. जिल्ह्यात आज, 18 मार्चला …
 

3 तालुके सव्वाशेच्या घरात , जळगाव , सिंदखेडराजात वाढला उद्रेक

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः विक्रमी नमुने संकलन, विक्रमी संख्येने प्राप्त अहवाल अन्‌ विक्रमी पॉझिटिव्हचा आकडा हे गत 24 तासांचे वैशिष्ट्य ठरले. याचबरोबर सिंदखेड राजा, जळगाव जामोद, नांदुरा मध्ये कोरोनाचा पुन्हा झालेला उद्रेक या गंभीर वैशिष्ट्यांमध्ये भर ठरली. जिल्ह्यात आज, 18 मार्चला 885 रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन दोन्हीही हादरले असल्याचे चित्र आहे.

मागील काही दिवसांच्या तुलनेत नमुने संकलनाची गती वाढवितानाच रॅपिड टेस्टवर भर देण्यात आला आहे. काल 1640 आरटीपीसीआर तर 4881 रॅपिड असे प्रमाण होते. यामुळे तब्बल 6096 अहवाल प्राप्त झाले. यातील 885 पॉझिटिव्ह तर 5193 निगेटिव्ह आढळले.

तिघे शतकवीर

खामगाव तालुक्‍यात 129, मलकापुरात 129 तर बुलडाणा तालुक्यात 119 पॉझिटिव्ह आढळले. 4 तालुके सेंच्युरीच्या उंबरठ्यावर थबकले हा दिलासा मानावा काय? तसेच  पॉझिटिव्हीटी दर कमी म्हणजे 14.51 टक्के इतका येणे हा यंत्रणांसाठी दिलासा असला तरी सर्वसामान्य 885 च्या आकड्याने हादरून गेलेत.

मातृतीर्थ अन्‌ जळगाव जामोद हादरले

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून शांत असलेल्या  सिंदखेडराजा तालुक्यात कोरोनाने अचानक स्फोटक एन्ट्री केली आहे. जवळपास शतकापर्यंत (92रुग्ण) पोहोचलेल्या या आकड्याने मातृतीर्थ हादरने स्वाभाविक ठरले!  याच धर्तीवर जळगाव जामोदमध्ये कोरोनाचा आकडा 87 पर्यंत गेल्याने यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. नांदुऱ्यात हा आकडा 85 पर्यंत गेलाय. या तुलनेत चिखली (51 पॉझिटिव्ह) मध्ये घट आली असे म्हणण्याची वेळ आली आहे.