बापरेss बाप! जिल्ह्यात 416 पॉझिटिव्ह!!कोरोनाचे रोज नवीन विक्रम

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः काही दिवसांपासून कोरोना नवनवीन रेकॉर्ड करत आहे. आज, 23 फेब्रुवारीला सकाळीच सर्व रेकॉर्डब्रेक करत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 416 वर गेली आहे. सध्याही जमावबंदीची चेष्टा करणारी पब्लिक अजूनही गंभीर नसली तरी आरोग्य यंत्रणासह जिल्हा प्रशासनात यामुळे हाय अलर्टचा मेसेज गेलाय! आता दुसऱ्या टप्प्यातील या वैऱ्याला रोखायचे तरी कसे, असा …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः काही दिवसांपासून कोरोना नवनवीन रेकॉर्ड करत आहे. आज, 23 फेब्रुवारीला सकाळीच सर्व रेकॉर्डब्रेक करत पॉझिटिव्ह रुग्‍णांची संख्या 416 वर गेली आहे. सध्याही जमावबंदीची चेष्टा करणारी पब्लिक अजूनही गंभीर नसली तरी आरोग्य यंत्रणासह जिल्हा प्रशासनात यामुळे हाय अलर्टचा मेसेज गेलाय! आता दुसऱ्या टप्प्यातील या वैऱ्याला रोखायचे तरी कसे, असा यक्ष प्रश्न ऐरणीवर आला आहे.

2020 च्या प्रारंभी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या कोरोनाने वर्षभर धुमाकूळ घातला. दिवाळी व ख्रिसमस साजरा करू देण्याचे सौजन्य दाखविणाऱ्या कोविडने काही काळ विश्रांती घेतली! याला तो परत फिरला. आपण जिंकलो अश्या गैरसमजातून जिल्हावासी बेफिकर राहिले. पण आता परतलेला कोरोना जाण्यापेक्षा घातक, चिवट, प्रबळ आहे की काय अशी शंका उपस्थित होणे रास्त ठरतेय.
या गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर आज तब्बल 416 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या शंकेला पुष्टी मिळते. यासाठी 2748 स्वब नमुने संकलित करण्यात आले होते. पैकी 2057 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 1633 जण नशीबवान ( निगेटिव्ह) ठरले! मात्र 416 जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. कालच्या तुलनेत पॉझिटिव्हीटी रेट कमी म्हणजे 20.22 टक्के इतका आहे. हाच काय तो दिलासा!