बाप रे बाप… जिल्ह्यात 24 तासांत आढळले 1130 कोरोनाबाधित!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः जिल्हा प्रशासनाच्या निर्देशावरून स्वॅब नमुने संकलन व चाचण्यांचा वेग वाढविण्यात आल्याने अर्थातच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आज 27 मार्चच्या मुहूर्तावर सर्वात मोठ्या अन् रेकॉर्ड ब्रेकिंग 1130 बाधितांच्या आकड्याची नोंद झाली आहे. यामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणा या कोरोना भूकंपामुळे अक्षरशः हादरल्या! हॉट स्पॉट ठरलेल्या बुलडाणा तालुक्याने स्वतःचेच रेकॉर्ड …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः जिल्हा प्रशासनाच्या निर्देशावरून स्वॅब नमुने संकलन व चाचण्यांचा वेग वाढविण्यात आल्याने अर्थातच कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आज 27 मार्चच्या मुहूर्तावर सर्वात मोठ्या अन्‌ रेकॉर्ड ब्रेकिंग 1130 बाधितांच्‍या आकड्याची नोंद झाली आहे. यामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणा या कोरोना भूकंपामुळे अक्षरशः हादरल्या!  हॉट स्पॉट ठरलेल्या बुलडाणा तालुक्याने स्वतःचेच रेकॉर्ड मोडीत काढत अडीचशेचा पल्ला गाठला तर  डेंजर झोनमधील चिखली तालुक्याने जवळपास 200 चा घातक टप्पा गाठलाय! यामुळे आता खऱ्या अर्थाने आरोग्य यंत्रणांची ‘ टेस्ट’ होणार असे गंभीर चित्र आहे.

बुलडाणा तालुक्‍यात 247 पॉझिटिव्ह, चिखली तालुक्‍यात 192, मलकापूर 136,  जळगाव जामोद 114, मेहकर 103 या तालुक्यांत नवीन विक्रमांची नोंद झाली. मुळात हे आकडेच बोलके म्हणजे  धोक्याची भाषा बोलणारे आहेत. जळगाव जामोद, मेहकर तालुक्यात काही दिवसांपासून होणारी वाढ अखेर 3 आकड्यांत रूपांतरित झाली.  बुलडाणा हॉट स्पॉट व यादीत टॉपर का, याचे उत्तर या आकड्यातून मिळाले आहे.  तब्बल 4 तालुक्यांत शतकपार तर एका तालुक्यात अडीच शतक ओलांडणे ही कोरोनाचा आवेग भयावह ठरणारा आहे.

या तुलनेत अन्य तालुके दुहेरी आकड्यात आले हाच काय तो दिलासा मानावा लागेल. तोही अति आशावादी व्यक्तिकरिताच! मोताळा 84, सिंदखेडराजा 53, खामगाव 84, लोणार 37, नांदुरा 36, देऊळगावराजा 33, शेगाव 30 असा अन्य तालुक्यांचा स्कोअर आहे. या भीषण लाटेत संग्रामपूरचा आकडा 0 येणे हा संशोधनाचा विषय ठरावा, हा तेथील निष्क्रिय व नियोजनशून्य प्रशासनाचा परिणाम आहे काय यावर  जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र आता सोशल मीडियावर कोरोनापासून वाचायचं असेल तर चला संग्रामपूर तालुक्यात चला असे संदेश झळकायला लागतील.