बाप रे बाप…! बुलडाण्यात आढळले दोन महाकाय अजगर!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरात आज, १५ जूनला दोन अजगर आढळले. सकाळी ७ वाजता मोठ्या देवीच्या मंदिरासमोर गणेश मोरे यांच्या घरात ४ फूट लांबीचा तर रात्री ८ च्या सुमारास छोट्या देवी मंदिराजवळील पोलीस लाईनमध्ये चक्क ९ फुटांचा अजगर आढळला आहे. सकाळच्या घटनेतील अजगराला सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. रात्रीच्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरात आज, १५ जूनला दोन अजगर आढळले. सकाळी ७ वाजता मोठ्या देवीच्या मंदिरासमोर गणेश मोरे यांच्या घरात ४ फूट लांबीचा तर रात्री ८ च्या सुमारास छोट्या देवी मंदिराजवळील पोलीस लाईनमध्ये चक्क ९ फुटांचा अजगर आढळला आहे.

सकाळच्‍या घटनेतील अजगराला सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. रात्रीच्‍या घटनेतील अजगराला सर्पमित्र यश वानखडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरक्षित पकडले आहे. सकाळी ७ च्या सुमारास मोठी देवी परिसरातील गणेश मोरे यांच्या घरात अजगर निघाल्याने कुटुंबियांचा थरकाप उडाला होता. मात्र सदैव दक्ष आणि तत्पर असलेल्या सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी घटना स्थळावरून या अजगराला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले.