“बाबुजी’कडे सापडले गुटख्याचे घबाड!; खामगावात कारवाई

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज, २८ जुलैला दुपारी खामगाव शहरातील बाबुजी ट्रेडर्सवर धडक कारवाई केली. या कारवाईत ३३ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पकडण्यात आला. आठवडे बाजारातील मुख्य रस्त्यावरील मे. बाबूजी ट्रेडर्स येथे गुटखा विक्री व साठवणूक होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली …
 
“बाबुजी’कडे सापडले गुटख्याचे घबाड!; खामगावात कारवाई

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अन्‍न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज, २८ जुलैला दुपारी खामगाव शहरातील बाबुजी ट्रेडर्सवर धडक कारवाई केली. या कारवाईत ३३ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा पकडण्यात आला.

आठवडे बाजारातील मुख्य रस्त्यावरील मे. बाबूजी ट्रेडर्स येथे गुटखा विक्री व साठवणूक होत असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे छापा मारला असता मयूर हरगोविंद शर्मा (३०, रा. बालाजी मंदिराजवळ, सराफा खामगाव) हा तंबाखू, गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी व इतर तत्सम अन्न पदार्थ असा एकूण ३३ हजार ८६१ रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या विना परवाना विक्री करताना मिळून आला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने कर्मचारी रवींद्र द्वारकादास सोळंके (३२) यांच्या तक्रारीवरून मयूरविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोहेकाँ गजानन जोशी करीत आहेत.