बाबोऽऽ झाडावर सरसर चढणाऱ्या ६ फुटी सापाला पाहून पोलीस दादा थक्क! मग त्यांनी “रिपोर्ट’ केल्यावर झाली “कारवाई’!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या बंगल्यावर तैनात असलेला तो पोलीस दादा समोरील झाडावर सरसर चढणाऱ्या तब्बल सहा फुटी सापाला पाहून प्रथम थक्क झाला. मग काही क्षण विचारमग्न झाला अन् नंतर त्यांनी “रिपोर्ट’ करताच तात्काळ कारवाई करण्यात येऊन त्याला जेरबंद करण्यात आले. काल, २८ ऑगस्ट रोजी सकाळी हा थरारक …
 
बाबोऽऽ झाडावर सरसर चढणाऱ्या ६ फुटी सापाला पाहून पोलीस दादा थक्क! मग त्यांनी “रिपोर्ट’ केल्यावर झाली “कारवाई’!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या बंगल्यावर तैनात असलेला तो पोलीस दादा समोरील झाडावर सरसर चढणाऱ्या तब्बल सहा फुटी सापाला पाहून प्रथम थक्क झाला. मग काही क्षण विचारमग्न झाला अन्‌ नंतर त्यांनी “रिपोर्ट’ करताच तात्काळ कारवाई करण्यात येऊन त्याला जेरबंद करण्यात आले.

काल, २८ ऑगस्ट रोजी सकाळी हा थरारक घटनाक्रम रंगला. न्यायमूर्ती स्वप्नील चंद्रकांत खटी यांच्‍या शासकीय निवासस्थानावर पोलीस जमादार निवृत्ती मुळे ड्युटीवर होते. ते गेटजवळ उभे असताना त्यांची नजर समोरील झाडावर गेली. त्यांना झाडावर तब्बल सहा फुटी साप दिसला. त्यांनी तात्काळ सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना फोन केला असता ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ते आपले सहकारी राहुल हिवाळे यांच्यासमवेत पोहोचेपर्यंत तो खट्याळ साप झाडावरून उतरत अडगळीच्या जागेत घुसला. मात्र रसाळ व हिवाळे यांनी प्रयत्नपूर्वक त्याला पकडून बरणीबंद केले. यावेळी यशोदीप खटी यांनी दोघांचे आभार मानले. हा साप धामण जातीचा असल्याचे रसाळ यांनी सांगितले. तो बिनविषारी असला तरी त्याने काही काळ परिसरात धमाल उडवून दिली.