बाबोऽऽ बुलडाण्याचं तापमान 41 अंशावर!; मार्चमध्येच तापायला लागलं!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मार्चमध्ये एकावर एक फ्री देणाऱ्या निसर्गावर टीका झाल्याने तो संतप्त झाला की काय कुणास ठाऊक! मात्र त्याने मार्चपूर्वीच आपला राग दाखवला. काल, 30 मार्चला जिल्हा मुख्यालयाचे तापमान 41 डिग्रीवर पोहोचले! मार्चमध्येच हा आकडा तर मे महिन्यात काय हाल होणार, या कल्पनेने हजारो बुलडाणेकर चिंतेत पडले आहेत. चालू …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मार्चमध्ये एकावर एक फ्री देणाऱ्या निसर्गावर टीका झाल्याने तो संतप्त झाला की काय कुणास ठाऊक! मात्र त्याने मार्चपूर्वीच आपला राग दाखवला. काल, 30 मार्चला जिल्हा मुख्यालयाचे तापमान 41 डिग्रीवर पोहोचले! मार्चमध्येच हा आकडा तर मे महिन्यात काय हाल होणार, या कल्पनेने हजारो बुलडाणेकर चिंतेत पडले आहेत.

चालू महिन्यात अवकाळी पावसाने गारपीट व विजासह हजेरी लावत हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी केली. यामुळे निसर्गाने उन्हाळ्यावर पावसाळा फ्री अशी काही स्कीम आणली काय अशी विचारणा झाली. यामुळे संतापलेल्या निसर्गाने मार्चपूर्वीच कडक प्रताप दाखवायला सुरुवात केली. बुलडाणा शहर तसे सौम्य हवामानासाठी ओळखले जाते. पण यंदा 30 मार्चलाच तापमापकाचा पारा 41 पर्यंत पोहोचला. बुलडाण्यात हे हाल तर खामगाव व अन्य हॉट नगरीत तापमान सर्व मर्यादा ओलांडणार, अशी भीती व्यक्त होत आहे. यापूर्वी 26 मार्चला तापमान 36 डिग्री होते. ते नंतर 37.8 डिग्री, 39 डिग्री सेल्सियस असे वाढत 40 वर पोहोचले आणि 30 तारखेला तापमान 41वर पोहोचले. यामुळे एप्रिल, मेमध्ये सूर्य काय काय पराक्रम करणार या कल्पनेने हजारो बुलडाणेकर धास्तावले आहेत.