बाबोऽऽ 13 फुटांचा अजगर पाहून शेतकऱ्याचे पायच लटपटले!; शेगावजवळील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिंगणा (ता. शेगाव) शिवारातील शेतात काल, 12 जूनच्या पहाटे साडेसहाच्या सुमारा शेतकऱ्याला भलामोठा अजगर दिसला. एवढा मोठ्ठा अजगर पाहून त्याचे पायच लटपटायला लागले. सर्पमित्राच्या मदतीने वनविभागाने हा अजगर पकडून बोथा घाटात सोडला आहे. 13 फुटांचा हा अजगर आहे. शेगाव शहरापासूनच जवळच हिंगणा गाव आहे. शेतकरी दिलीप सोनोने …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हिंगणा (ता. शेगाव) शिवारातील शेतात काल, 12 जूनच्‍या पहाटे साडेसहाच्‍या सुमारा शेतकऱ्याला भलामोठा अजगर दिसला. एवढा मोठ्ठा अजगर पाहून त्‍याचे पायच लटपटायला लागले. सर्पमित्राच्‍या मदतीने वनविभागाने हा अजगर पकडून बोथा घाटात सोडला आहे. 13 फुटांचा हा अजगर आहे.

शेगाव शहरापासूनच जवळच हिंगणा गाव आहे. शेतकरी दिलीप सोनोने यांना हा अजगर धुऱ्यावरून जाताना दिसला. त्‍यांनी सर्पमित्राला कळवल्‍यानंतर सर्पमित्रांनी वनविभागाच्‍या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्‍यानंतर वनविभागाचे अधिकारी श्री. डांगे, वनपाल दीपक शेगोकार, वनरक्षक श्रीमती बावणे यांनी सोनोने यांच्‍या शेतात जाऊन अजगराला पकडले. त्‍यानंतर त्‍याला बोथा घाटात सोडण्यात आले. याशिवाय पहुरजिरा (ता. शेगाव) येथेही मांडूळ जातीचा बिनविषारी साप आढळला होता. त्‍यालाही पकडून संरक्षित क्षेत्रात सोडण्यात आले.