बाबोऽ! गोठ्यात शिरला ९ फुटी अजगर!! जनावरांचे हंबर्डे अन्‌ शेतकऱ्यासह गावकऱ्यांची धावपळ…; चिखली तालुक्‍यातील थरार

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जनावरांच्या गोठ्यात गेले अन् मालकाला आत काहीतरी वेगळेच असल्याची धोक्याची जाणीव झाली. एका अनाहूत अन् धोकादायक पाव्हण्याचे दर्शन झाले… गुरांचे हंबर्डे अन् गावकऱ्यांची धावपळ सुरू झाली. मग एका “तज्ज्ञा’चे आगमन झाल्यावर हा सर्व गोंधळ थांबला… चिखली तालुक्यातील टाकरखेड हेलगा गावाने ३ सप्टेंबरच्या संध्याकाळी पाचच्या सुमारास हा खळबळजनक …
 
बाबोऽ! गोठ्यात शिरला ९ फुटी अजगर!! जनावरांचे हंबर्डे अन्‌ शेतकऱ्यासह गावकऱ्यांची धावपळ…; चिखली तालुक्‍यातील थरार

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जनावरांच्या गोठ्यात गेले अन्‌ मालकाला आत काहीतरी वेगळेच असल्याची धोक्याची जाणीव झाली. एका अनाहूत अन्‌ धोकादायक पाव्हण्याचे दर्शन झाले… गुरांचे हंबर्डे अन्‌ गावकऱ्यांची धावपळ सुरू झाली. मग एका “तज्‍ज्ञा’चे आगमन झाल्यावर हा सर्व गोंधळ थांबला…

चिखली तालुक्यातील टाकरखेड हेलगा गावाने ३ सप्टेंबरच्या संध्याकाळी पाचच्‍या सुमारास हा खळबळजनक थरार अनुभवला! सतीश महाराज गुंजकर हे गोठ्यात गेल्यावर त्यांना लांबलचक सापाचे दर्शन झाले. यामुळे त्यांनी आरडाओरड केल्यावर गावकरी जमा झाले. पण आत जायची हिंमत कोण करणार? मग एकाने सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना फोन केला. ते ऑन ड्युटी असल्याने त्यांनी आपले उंद्री येथील सहकारी श्याम तेल्हारकर यांना पाठविले. त्यांनी तात्काळ टाकरखेड येथे पोहोचून तब्बल ९ फूट लांबीच्या जाडजूड अजगराला आपला अनुभव व ताकद पणाला लावून जेरबंद केले. याची माहिती वन विभागाला देण्यात आली असून, त्या अजगराला जंगलात सोडण्यात येणार असल्याचे रसाळ यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले.