बाबो लई हाणलं त्‍याला… मलकापूर पांग्रात एकच चर्चा…शांत, संयमी ठाणेदारांचा अनुभवला रौद्रावतार!!

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एकीकडे कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे यंत्रणा हतबल झाली आहे. असे असतानाही लाेकांना मात्र गांभीर्य नाही. त्यामुळे शांत व संयमी म्हणून ओळख असलेल्या ठाणेदार जितेंद्र आडोळे यांचा रौद्रावतार आज, 18 एप्रिलला निष्काळजीपणे वावरणाऱ्या नागरिकांना आणि नियमांकडे कानाडोळा करणाऱ्या दुकानदारांना मलकापूर पांग्रा (ता. मलकापूर) येथे पहायला …
 

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः एकीकडे कोरोना रुग्‍ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्‍यामुळे यंत्रणा हतबल झाली आहे. असे असतानाही लाेकांना मात्र गांभीर्य नाही. त्‍यामुळे शांत व संयमी म्‍हणून ओळख असलेल्या ठाणेदार जितेंद्र आडोळे यांचा रौद्रावतार आज, 18 एप्रिलला निष्काळजीपणे वावरणाऱ्या नागरिकांना आणि नियमांकडे कानाडोळा करणाऱ्या दुकानदारांना मलकापूर पांग्रा (ता. मलकापूर) येथे पहायला मिळाला.

ग्रामीण भागात कोरोना रुग्‍ण मोठ्या प्रमाणात आढळत असले तरी गावात कसला आलाय कोरोना असे म्‍हणून अनेक महाभाग गांभीर्याने घेत नाहीत. कारण नसताना इकडे तिकडे फिरत असतात. त्‍यांच्‍या तोंडाला मास्‍कही नसतो. त्‍यांना ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी चांगलाच प्रसाद दिला. पोलीस व ग्रामपंचायत रोज सूचना करून करून थकली आहे. तरीही अनेक जण घोळक्याने बसथांब्‍यावर थांबून असतात. वैतागलेल्या प्रशासनाने आज दंडुका हातात घेऊन प्रसाद वाटला. विनाकारण फिरणाऱ्यांनाही दंड ठोठावला. बंद असतानाही पान टपऱ्या व हॉटेल चालू ठेवणाऱ्यांना धडा शिकवला. मलकापूर पांग्राला जणू छावणीचे स्वरूप प्राप्‍त झाले होते. ठाणेदार श्री. आडोळे व दुय्यम ठाणेदार श्री. राणे व मलकापूर पांग्राचे बीट जमादार नारायण गीते, पोलीस कॉन्स्टेबल विशाल बनकर, पोलीस कॉन्स्टेबल श्री. मापारी यांच्‍यासह पथकाने ही कारवाई केली.