बायकोला आणायला येणे जावयाला पडले महागात! देऊळगाव राजातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बायकोला आणायला सासरवाडीत आलेल्या मेव्हण्याला साल्याने लोखंडी गजाने जबर मारहाण केली. ही घटना काल, 22 एप्रिलच्या रात्री 10 च्या सुमारास देऊळगाव राजा येथे घडली. याप्रकरणी सैन्यदलात जवान असलेल्या मेव्हण्याने साल्याविरोधात देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आज, 23 एप्रिल रोजी सकाळी तक्रार दिली आहे. गजानन बाबुराव जोहरे (35, रा. शेलगाव आटोळ, ता. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बायकोला आणायला सासरवाडीत आलेल्या मेव्हण्याला साल्याने लोखंडी गजाने जबर मारहाण केली. ही घटना काल, 22 एप्रिलच्‍या रात्री 10 च्या सुमारास देऊळगाव राजा येथे घडली. याप्रकरणी सैन्यदलात जवान असलेल्या मेव्हण्याने साल्याविरोधात देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आज, 23  एप्रिल रोजी सकाळी तक्रार दिली आहे.

गजानन बाबुराव जोहरे (35, रा. शेलगाव आटोळ, ता. चिखली, ह. मु. कुंभारझरी ता. देऊळगावराजा) हे सैन्यदलात जम्मू काश्मीर येथे जवान आहेत. 19 मार्चपासून ते सुटीवर गावाकडे आले आहेत. तेव्हापासून त्यांची पत्‍नी 2 मुलांसह माहेरी गेली होती. काल 22, एप्रिलला ते बायकोला आणण्यासाठी सासरवाडीत गेले होते तेव्हा बायको घरी यायला तरी नव्हती. तेव्हा जोहरे यांच्या साल्याने माझी बहीण तुमच्यासोबत पाठवत नाही असे म्हणत वाद घातला. शिविगाळ करून लोखंडी गजाने मेव्‍हण्याला डोक्यात मारहाण केली. या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी राहुल देवलाल डोंगरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.