बायको माहेरी गेली अन्‌ तरुणाने घेतला गळफास; वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल, १२ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या सुमारास गोहोगाव (ता. मेहकर) येथे घडली. धनंजय वसंताआप्पा बोंद्रे (२९, रा. गोहोगाव, ता. मेहकर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. धनंजयचे गावातच झेरॉक्स व ऑनलाइन सेंटर होते. यासोबतच तो शेतीही करायचा. वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. …
 
बायको माहेरी गेली अन्‌ तरुणाने घेतला गळफास; वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल, १२ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या सुमारास गोहोगाव (ता. मेहकर) येथे घडली. धनंजय वसंताआप्पा बोंद्रे (२९, रा. गोहोगाव, ता. मेहकर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

धनंजयचे गावातच झेरॉक्स व ऑनलाइन सेंटर होते. यासोबतच तो शेतीही करायचा. वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याची पत्नी माहेरी गेलेली होती. काल त्याचे आई- वडील बाहेर गेलेले होते. त्याचवेळी त्याने घराच्या माडीवर लाकडी बल्लीला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. शेजारच्या घरातून तो गळफास घेतलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांना दिसला. या घटनेची माहिती डोणगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. धनंजयच्‍या पश्चात आई, वडील, पत्नी, मोठा भाऊ असा परिवार आहे.