बार फोडून पावणेसात लाखांची विदेशी दारू लंपास; किनगाव राजाजवळील घटना

किनगाव राजा, ता. सिंदखेड राजा (नीलेश डिघोळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निर्बंधांमुळे बंद असलेले बार-रेस्टॉरंट फोडून 6 लाख 84 हजार 783 रुपयांची विदेशी दारू चोरट्यांनी लंपास केली. ही घटना काल, 23 मे रोजी सकाळी उघडकीस आली. किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत किनगावराजा ते दुसरबीड रस्त्यावर असलेल्या प्रतीक वाईन बार चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. चोरीत …
 

किनगाव राजा, ता. सिंदखेड राजा (नीलेश डिघोळे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः निर्बंधांमुळे बंद असलेले बार-रेस्टॉरंट फोडून 6 लाख 84 हजार 783 रुपयांची विदेशी दारू चोरट्यांनी लंपास केली. ही घटना काल, 23 मे रोजी सकाळी उघडकीस आली.

किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत किनगावराजा ते दुसरबीड रस्त्यावर असलेल्या प्रतीक वाईन बार चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. चोरीत वापरलेले टाटा मॅजिक वाहन (क्रमांक एमएच 28 एच 8994) किनगाव राजा पोलिसांनी आडगाव राजा शिवारातून जप्त केले आहे. हे वाहन सिंदखेडराजा पोलीस स्टेशन हद्दीतीतल आडगाव राजा  शिवारात बेवारस अवस्थेत उभे होते. चोरी गेलेल्या मालापैकी काही माल या वाहनात मिळून आल्याने पोलिसांनी वाहन ताब्यात घेतले आहे. चोरट्यांना शोधून काढण्याचे आव्हान किनगाव राजा पोलिसांसमोर आहे. प्रकरणाचा तपास किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ राजू दराडे, जकिर पठाण, रोशन परसुवाले, गजानन सानप करीत आहेत.