बाहर से कुछ, अंदर से कुछ… नमकीनच्‍या हॉटेलमध्ये सोमरसाचीही सोय!; अमडापूर पोलिसांच्‍या झडतीत कारनामा समोर!!

अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उंद्री- लाखनवाडा रोडवरील एका नमकीनच्या हॉटेलमध्ये देशी दारूच्या 63 बाटल्या अमडापूर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई काल, 1 मेच्या सकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली. पोलीस उपनिरिक्षक प्रविण शंकर सोनवणे यांच्या तक्रारीवरून हॉटेलमालक शेख शरीफ शेख शब्बीर (38, रा. उंद्री ता. चिखली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्री. सोनवणे …
 

अमडापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः उंद्री- लाखनवाडा रोडवरील एका नमकीनच्‍या हॉटेलमध्ये देशी दारूच्‍या 63 बाटल्‍या अमडापूर पोलिसांनी जप्‍त केल्या आहेत. ही कारवाई काल, 1 मेच्‍या सकाळी साडेसातच्‍या सुमारास करण्यात आली.

पोलीस उपनिरिक्षक प्रविण शंकर सोनवणे यांच्‍या तक्रारीवरून हॉटेलमालक शेख शरीफ शेख शब्बीर (38, रा. उंद्री ता. चिखली) याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. श्री. सोनवणे यांच्‍यासह पोकाँ गजानन राजपूत, पोकाँ अमोल काकडे, पोकाँ राहुल जाधव हे पेट्रोलिंग करत असताना त्‍यांना गुप्त बातमीदारातर्फे माहिती मिळाली की एक जण उंद्री ते लाखनवाडा रोडवरील साइकृपा नमकीन हॉटेलमागे देशी दारुच्या बाटल्या बाळगून विक्री करीत आहे. दोन पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी लगेच या हॉटेलकडे मोर्चा वळवला. हॉटेल उघडीच होती. हॉटेलमागे जाऊन पाहिले असता तेथे शेख शरीफ शेख शब्बीर हा मिळून आला. हॉटेल त्याचीच असल्याचे त्याने सांगितले. हॉटेलची झडती घेतली असता मागे हिरव्या नेटच्या झोपडीत पांढऱ्या थैलीमध्ये देशी दारूच्‍या 63 बाटल्‍या (1638 रुपयांच्‍या) मिळून आल्या.