बाहुबली आमदार संजय गायकवाड… ‘रस्ता अडवणारे’ ते असे केले बाजूला! (व्हिडिओ)

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड तसे आक्रमक नेते… आली अंगावर तर घेतले शिंगावर… या रोखठोक पद्धतीने वागणारे अन् राजकारण करणारे, मात्र ते साधेपणाही जपतात अन् बडेजाव मिरवत नाही हेही त्यांच्या स्वभावाचे एक वेगळेपणच! ही बाब एका साध्या प्रसंगातून पुन्हा दिसून आली. त्याचे झाले असे की, आमदार …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड तसे आक्रमक नेते… आली अंगावर तर घेतले शिंगावर… या रोखठोक पद्धतीने वागणारे अन्‌ राजकारण करणारे, मात्र ते साधेपणाही जपतात अन्‌ बडेजाव मिरवत नाही हेही त्‍यांच्‍या स्‍वभावाचे एक वेगळेपणच! ही बाब एका साध्या प्रसंगातून पुन्‍हा दिसून आली.

त्याचे झाले असे की, आमदार संजय गायकवाड हे 29 मे रोजी संध्याकाळी मोताळा तालुक्यातील गुळभेली ते राहेरी दरम्यान संपर्क दौऱ्यावर होते. काल संध्याकाळी मोताळा तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याचा वेग इतका होता की अनेक ठिकाणी मोठाली झाडे उन्मळून पडली. ते जात असलेल्या रस्त्यावरही असाच एक मोठा वृक्ष रस्ता अडवून पडलेला होता. यामुळे वाहतूक ठप्प होण्याची शक्यता लक्षात घेऊन व कोणत्याही अधिकारी वा कर्मचाऱ्यास फोन न करता स्वतः आमदार झाड बाजूला करण्यासाठी पुढे सरसावले. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने ‘जोर लगाके हैश्या’ या पद्धतीने ते झाड रस्त्याच्या कडेला केले, यानंतरच ते पुढील प्रवासाला रवाना झाले…