बाssबो! EPS 95 पेंशनर्सच्या साखळी उपोषणाला झालेत विक्रमी 1001 दिवस! पण अजूनही न्याय मिळेना!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एखादी संघटना कितीही स्ट्राँग असो त्यांचे आंदोलन चालून चालून किती दिवस चालणार? असा प्रश्न कुणी विचारला तर फार तर 20 ते 30 दिवस असेच उत्तर येईल, मात्र तुटपुंज्या पेन्शनवर आपल्यासह कुटुंबाची गुजराण करणाऱ्या EPS 95 पेन्शनर्स संघटनेच्या वतीने बुलडाणा येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाने सर्व रेकॉर्ड मोडीत …
 
बाssबो! EPS 95 पेंशनर्सच्या साखळी उपोषणाला झालेत विक्रमी 1001 दिवस! पण अजूनही न्याय मिळेना!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एखादी संघटना कितीही स्ट्राँग असो त्यांचे आंदोलन चालून चालून किती दिवस चालणार? असा प्रश्न कुणी विचारला तर फार तर 20 ते 30 दिवस असेच उत्तर येईल, मात्र तुटपुंज्या पेन्शनवर आपल्यासह कुटुंबाची गुजराण करणाऱ्या EPS 95 पेन्शनर्स संघटनेच्या वतीने बुलडाणा येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढीत तब्बल 1001 वा दिवस गाठला असून अजूनही हे आंदोलन नॉट आऊट पद्धतीने सुरूच हाय!

वृद्ध पेन्शनधारक आपल्या न्याय मागण्यांकरिता गेल्या अनेक वर्षांपासून गल्ली ते दिल्लीपर्यंत विविध प्रकारची आंदोलने राष्ट्रीय समिति चे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वा मध्ये करीत आहेत. अनेक नेते, मंत्री, संसद सदस्य यांच्‍यापासून पंतप्रधान महोदयापर्यंत भेटीगाठी, निवेदने दिली गेलीत. आश्वासने मिळाली तरीदेखील अजूनपावेतो या पेन्शन धारकांना न्याय मिळाला नाहीये! त्यामुळे पुन्हा एकदा सरकारला कुंभकर्णी झोपेतून जागे करण्यासाठी 1000 दिवस पूर्ण झाल्याने मूक मोर्चा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

मात्र काही अपरिहार्य कारणामुळे मोर्चा पुढे ढकलण्यात आला. त्याऐवजी एक छोटेखानी बैठक २० सप्टेंबरला आयोजित करण्यात आली होती. यानंतर जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्‍यांचे अधिकार कक्षातील बाबीवर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनेचे सर्वेसर्वा कमांडर अशोक राऊत यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले. शिष्टमंडळात राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय मुख्य सल्लागार पी. एन. पाटील, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा शोभा आरस, पश्चिम क्षेत्र समन्वयक सरिता नारखेडे, नाना गरकल व जिल्हा सह सचिव पी. जी. उबरहंडे यांचा समावेश होता.