बिग ब्रेकिंग! जिल्ह्यात संचारबंदी लागू!!

5 ते 9 वीच्या वर्गांसह कॉलेज, कोचिंग बंद; आठवडी बाजार संध्याकाळी 4 पर्यंतच, बुलडाणा लाईव्हचे ‘ते’ वृत्त तंतोतंत खरे बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानाने अखेर कठोर पाऊले उचलली असून, कडक निर्बध लागू केले आहे. 16 फेब्रुवारीला यासंदर्भात मॅरेथॉन बैठक सुरू असतानाच बुलडाणा लाईव्हने प्रसारित केलेले वृत्त …
 

5 ते 9 वीच्या वर्गांसह कॉलेज, कोचिंग बंद; आठवडी बाजार संध्याकाळी 4 पर्यंतच, बुलडाणा लाईव्हचे ‘ते’ वृत्त तंतोतंत खरे

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानाने अखेर कठोर पाऊले उचलली असून, कडक निर्बध लागू केले आहे. 16 फेब्रुवारीला यासंदर्भात मॅरेथॉन बैठक सुरू असतानाच बुलडाणा लाईव्हने प्रसारित केलेले वृत्त तंतोतंत खरे ठरले असून, बुलडाणा लाईव्हच्या विश्वासार्हतेवर पुन्हा शिक्कामोर्तब झालेय!
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. रामामूर्ती यांनी यासंदर्भातील 4 पानी तपशीलवार आदेश जारी केले असून, याची आज 17 फेब्रुवारीच्‍या मध्यरात्रीपासूनच अंमलबाजवणी होणार आहे. प्रभारी अप्पर जिल्‍हाधिकारी दिनेश गीते यांनी याची पुष्टी केली आहे. यानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच भरणार असून, निर्देशांचे पालन करण्यासाठी पालिका व ग्रामपंचायत यांच्याकडून पथके गठीत करण्यात येत आहेत. नुकतेच सुरू करण्यात आलेले 5 ते 9 वीचे वर्ग, सर्व कॉलेज, खासगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग व कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. सर्व यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलन, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठकांमध्ये केवळ 50 व्यक्तींनाच उपस्थित राहता येणार आहे. महत्वाचे म्हणजे मिरवणूक, रॅली काढण्यास मनाई करण्यात आली असून, याची जबाबदारी पोलीस विभागावर टाकण्यात अली आहे लग्‍नांना केवळ 50 वऱ्हाड्यांनाच परवानगी राहणार असून, रात्री 10 पर्यंतच परवानगी राहणार आहे. मंदिर, मस्जिद, चर्च आदी ठिकाणी गर्दी करण्यास मनाई असून, सुरक्षित अंतर व मास्कचा वापर बंधनकारक राहणार आहे. दुकाने, हॉटेलमध्ये, मास्क घातलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्याचे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहे.