बिरसिंगपुरात 31 दात्यांनी केले रक्तदान; ‘शिवप्रतिष्ठान’चा पुढाकार

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात असलेला रक्ताचा तुटवडा व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मान्यवरांनी केलेले आवाहन लक्षात घेता तालुक्यातील बिरसिंगपूर येथील शिवप्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 31 जणांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. मारोती मंदिर परिसरात कोरोनाविषयक निर्देशांचे पालन करून बुलडाणा अर्बन ब्लड बँकेच्या सहकार्याने शिबिर आयोजित …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात असलेला रक्ताचा तुटवडा व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मान्यवरांनी केलेले आवाहन लक्षात घेता तालुक्यातील बिरसिंगपूर येथील शिवप्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 31 जणांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.

मारोती मंदिर परिसरात कोरोनाविषयक निर्देशांचे पालन करून बुलडाणा अर्बन ब्लड बँकेच्या सहकार्याने शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी सरपंचपती संजय शिंदे, सदस्यपती केशव रदाळ, अनिल मुळे, पंकज मुळे, विक्की रदाळ, गणेश राऊत, कृष्णा साबळे, प्रशांत कांबळे यांच्‍यासह युवक व गावकऱ्यांनी रक्तदान केले. आयोजनासाठी सरपंच वैशाली मुळे, उपसरपंच राजूदादा मुळे, प्रशांत कांबळे, पंकज मुळे यांनी सहकार्य केले. कोरोना काळात रक्तदानाचा उपक्रम राबवून  शिवप्रतिष्ठान व गावकऱ्यांनी इतर गावांसमोर एक आदर्श मांडला आहे.