बिस्किट, चिप्सवर चोरट्यांचा डल्ला; सागवनमध्ये किराणा दुकान फोडले

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सागवन (ता. बुलडाणा) येथील कुरेशी लेआउटमध्ये किराणा दुकान फोडून चोरट्यांनी बिस्किट, चिप्ससह 700 रुपयांच्या साहित्यावर डल्ला मारला. ही घटना 7 फेब्रुवारीच्या रात्री 8 ते 8:30 च्या दरम्यान घडली.उत्तम श्रीराम टेकाळे (51) यांचे घराला लागूनच किराणा दुकान आहे. घराला कुलूप लावून ते बाहेरगावी गेले होते. आज, 8 फेब्रुवारीला …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सागवन (ता. बुलडाणा) येथील कुरेशी लेआउटमध्ये किराणा दुकान फोडून चोरट्यांनी बिस्किट, चिप्ससह 700 रुपयांच्या साहित्यावर डल्ला मारला. ही घटना 7 फेब्रुवारीच्या रात्री 8 ते 8:30 च्या दरम्यान घडली.
उत्तम श्रीराम टेकाळे (51) यांचे घराला लागूनच किराणा दुकान आहे. घराला कुलूप लावून ते बाहेरगावी गेले होते. आज, 8 फेब्रुवारीला दुपारी परतले तेव्हा त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आज जाऊन बघितले तर दुकानातील बिस्किट पुडे, चिप्स, दाळ असा एकूण 700 रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. टेकाळे यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.काँ. कोकीला तोमर करत आहेत.