बिहारमध्ये उभे राहतेय क्रिकेटच्या देवाचे मंदिर

मुजफ्फरपूरः आपल्याकडे चित्रपटांचे हीरो, क्रिकेटपटूंना आणि काही ठिकाणी नेत्यांनाही दैवत मानले जाते. दक्षिणेतील नेत्यांसाठी त्यांचे चाहते काहीही करायला तयार होतात. सातारा जिल्ह्यातील एका घरात शरद पवार यांची देवांप्रमाणे पूजा केली जाते. काही ठिकाणी नेत्यांची, क्रिकेटपटूंची मंदिरे बांधली जात आहेत. आता त्यात मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर यांचाही समावेश झाला आहे. सचिन तेंडुलकर हा अवघ्या विश्वातील लोकप्रिय …
 

मुजफ्फरपूरः आपल्याकडे चित्रपटांचे हीरो, क्रिकेटपटूंना आणि काही ठिकाणी नेत्यांनाही दैवत मानले जाते. दक्षिणेतील नेत्यांसाठी त्यांचे चाहते काहीही करायला तयार होतात. सातारा जिल्ह्यातील एका घरात शरद पवार यांची देवांप्रमाणे पूजा केली जाते. काही ठिकाणी नेत्यांची, क्रिकेटपटूंची मंदिरे बांधली जात आहेत. आता त्यात मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर यांचाही समावेश झाला आहे.

सचिन तेंडुलकर हा अवघ्या विश्वातील लोकप्रिय नेता. माणूस असला, तरी त्याला दैवत मानणारे चाहते कमी नाहीत. बिहारमधील मुझफ्फरपूर इथंही त्याचा असाच एक निस्सीम भक्त आहे. त्याचं नाव सुधीर कुमार. त्याला सचिनचं मंदिर बांधायचं आहे; परंतु त्यासाठी कुणापुढंही हात पसरणार नाही. स्वकमाईतून तो मंदिर बांधणार आहे.चार वर्षांत तो मंदिर बांधणार आहे. दामोदपूर इथं तो जागा शोधत आहे. मंदिरासाठी त्यानं रुपरेषा तयार केली आहे. सचिनचं मंदिर बांधण्याची कल्पना त्याला चित्रपट अभिनेत्यांच्या मंदिरावरून सुचली. सचिनचा मार्बलचा पुतळा तो बसवणार आहे. सचिनकडून त्याची फक्त मंदिराच्या उद्‌घाटनाला यावं एवढीच माफक अपेक्षा आहे.