बीपी, शुगरच्‍या त्रासाने कंटाळलेल्या वृद्धाने संपवली जीवनयात्रा; खामगाव शहरातील हृदयद्रावक घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मधुमेह, रक्तदाबाच्या आजाराने त्रस्त 88 वर्षीय वृद्धाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, 30 एप्रिलला पहाटे खामगाव शहरातील गजानन कॉलनीत समोर आली. बबन भावजी दामोदर असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. उपचारांना त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. त्यामुळे घरातील स्वयंपाक घरात त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. हा प्रकार …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मधुमेह, रक्‍तदाबाच्‍या आजाराने त्रस्‍त 88 वर्षीय वृद्धाने घरातच गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना आज, 30 एप्रिलला पहाटे खामगाव शहरातील गजानन कॉलनीत समोर आली.

बबन भावजी दामोदर असे आत्‍महत्‍या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. उपचारांना त्‍यांची प्रकृती साथ देत नव्‍हती. त्‍यामुळे घरातील स्‍वयंपाक घरात त्‍यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. हा प्रकार सकाळी समोर आला. रमेश कळसकार यांनी खामगाव शहर पोलिसांना कळवल्याने पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.