बुलडाणा ः मंदिर झाडण्यासाठी आलेल्या महिलांना पाहिले धक्कादायक दृश्य!

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील जुनागाव शिवाजीनगर परिसरात देवीच्या मंदिरासमोर आज, 17 जानेवारीला सकाळी विनोद केशव पवार (27, रा. संभाजीनगर) याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडली. मंदिराची साफसफाई करण्यासाठी महिला आल्या असता त्यांना मृतदेह दिसला. विनोद दोन दिवसांपासून बेपत्ता होता, असे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील जुनागाव शिवाजीनगर परिसरात देवीच्या मंदिरासमोर आज, 17 जानेवारीला सकाळी विनोद केशव पवार (27, रा. संभाजीनगर) याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडली. मंदिराची साफसफाई करण्यासाठी महिला आल्या असता त्यांना मृतदेह दिसला. विनोद दोन दिवसांपासून बेपत्ता होता, असे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवला.