बुलडाणा अर्बनच्या कर्मचाऱ्यांना कोरोना काळात १० टक्के पगारवाढ

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी भारतातील सर्वात मोठी पतसंस्था आहे. आजरोजी या संस्थेचा १६,५०० कोटींचा व्यवसाय आहे. संस्थेच्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांत ४६५ शाखा कार्यरत असून, संस्थेत ४००० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात सुध्दा संस्थेच्या सर्व सभासदांना अखंड सेवा दिली. इतरत्र कर्मचारी कपात वा पगारात कमी होत …
 
बुलडाणा अर्बनच्या कर्मचाऱ्यांना कोरोना काळात १० टक्के पगारवाढ

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी भारतातील सर्वात मोठी पतसंस्था आहे. आजरोजी या संस्थेचा १६,५०० कोटींचा व्यवसाय आहे. संस्थेच्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांत ४६५ शाखा कार्यरत असून, संस्थेत ४००० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात सुध्दा संस्थेच्या सर्व सभासदांना अखंड सेवा दिली. इतरत्र कर्मचारी कपात वा पगारात कमी होत असताना संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी मात्र बुलडाणा अर्बनच्या कर्मचाऱ्यांना सरसकट १० टक्के पगारवाढ दिली आहे.

कोरोना काळात बऱ्याच कंपन्या बंद पडल्या, उद्योग बुडाले. कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, असे असताना बुलडाणा अर्बनने १० टक्के पगारवाढ देऊन २०० युवकांना नवीन रोजगार उपलब्ध करून दिला. समाजातील गरजू व गरीब कुटुंबांना बचत गटामार्फत हिंदुस्थान मायक्रो फायनान्स कंपनीच्या माध्यमातून कोरोना काळात ३५ हजार सभासदांना ८० कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. कोरोना काळात बुलडाणा अर्बनने मागीलवर्षी संस्थेच्या सभासदांना ९ टक्के लाभांशचे वाटप केले आहे.

बुलडाणा अर्बनने स्थापनेपासून विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले असून, त्या माध्यमातून ग्रामीण भागात ६५० गोदामे, कोल्ड स्टोअरेज, इंग्रजी माध्यमांच्या शाळा, रुग्णवाहिका सेवा तसेच भाविक भक्तांसाठी शिर्डी, माहूरगड व तिरुपती येथे भक्तनिवास बांधले असून, १०० खोल्यांचे अयोध्या येथे भक्तनिवास लवकरच उभारण्यात येत आहे, असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.